शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

आठ दिवसांत अभियंत्याची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:25 AM

तिरोडा पं.स., जि.प. बांधकाम व पाटबंधारे विभागामध्ये एकही स्थायी अभियंता नसल्याने विकास कामे रखडली आहेत.

मनोज डोंगरे : रिक्त पदामुळे कामे खोळंबली, उपोषणाला बसण्याचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : तिरोडा पं.स., जि.प. बांधकाम व पाटबंधारे विभागामध्ये एकही स्थायी अभियंता नसल्याने विकास कामे रखडली आहेत. याविषयी जि.प. गोंदियाचे कार्यकारी अभियंता यांनी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी गोंदिया जि.प.चे कार्यकारी अभियंता बी.डब्ल्यू. कोहळे यांची भेट घेतली. यावेळी जि.प. सदस्य सुरेश हर्षे, पंधरे आणि गौतम उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य डोंगरे यांनी तिरोडा पं.स. आणि अन्य विभागात दोन अभिंयते कार्यरत होते. त्या दोघांना हटविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी एकही अभियंता देण्यात आला नाही. कार्यकारी अभियंता जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी.डब्ल्यू. कोहळे यांना तिरोडा पं.स.मध्ये स्थायी एकही अभियंता नाही तर कामे कसे होणार? दोन्ही अभियंत्याला हटविण्यात आले तर त्या ठिकाणी नवीन अभियंता यांची व्यवस्था कशी काय करण्यात आली नाही असा सवालही जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांनी केला. पं.स.मध्ये कामानिमित्ताने गेल्यास अभिंयात नसल्याने कामे ठप्प पडली आहेत. अभियंता नसल्याने कामाचे बिल तयार करणे झालेल्या कामाचे मुल्यमापन करुन पास करणे असे अनेक कामे पडून आहेत. पं.स. स्तरावर बांधकाम विभाग हे अतिशय महत्वाचे व जबाबदारीचे पद असताना नवीन अभियंत्याची नियुक्ती करण्यापूर्वीच अभियंत्याला कसे हटविले असा सवालही यावेळी उपस्थित केला. या भोंगळ कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. येत्या ८ ते १० दिवसात तिरोडा येथे अभियंत्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर शांत बसणार नसून सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा जि.प. सदस्य डोंगरे यांनी कार्यकारी अभियंता बी.डब्ल्यू. कोहळे यांना दिला. यावेळी उपस्थित जि.प. सदस्य सुरेश हर्षे आणि जि.प. सदस्य पंधरे यांनीही कार्यकारी अभियंता यांना त्वरित व्यवस्था करण्यात यावी, असे सूचविले. अन्यथा आम्ही जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांच्यासह आमरण उपोषणाला बसृ असे कार्यकारी अभियंंता यांना सांगितले. कार्यकारी अभियंता सार्वजनिक यावर बी.डब्ल्यू. कोहळे यांनी यावेळी सांगितले की, अभियंत्याचे रिक्त पद भरण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी प्रतिनियुक्तीद्वारे रिक्त असलेले अभियंत्याचे पद त्वरीत भरण्याचे असे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. विकास कामांमध्ये अडथळे आणू नका जनतेच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, क्षेत्रात विकासाचे कामे व्हायला पाहिजे. याला आम्ही प्राधान्य देत असतो. अधिकाऱ्यांनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचे नियोजन करुन विकास कामे रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्या अधिकाऱ्याला आम्ही कधीही सोडणार नाही. अधिकाऱ्यांनी याची समजूत घ्यावी असे जि.प. स्थायी समिती सदस्य सुरेश हर्षे म्हणाले.