लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आशा सेविका आणि गटप्रवर्तक मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात मानधन तत्वावर कार्यरत आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांच्याकडून अनेक कामे करुन घेतली जात आहे. शासनाने त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले. पंरतू अद्यापही त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तकांमध्ये रोष व्याप्त आहे. याच विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वात मंगळवारी आशा सेविकांनी जिल्हा परिषदेवरमोर्चा काढला.स्थानिक पाल चौकातून दुपारी १२ वाजता मोर्चा सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरुन थेट जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. मोर्चात जिल्हाभरातील आशा सेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. जि.प. समोर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाजी केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना दिले.निवेदनातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पोहचविण्यात आशा सेविका आणि गटप्रवर्तकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांच्यावर असलेल्या कामाच्या जबाबदारीपेक्षा त्यांना दिले जाणारे मानधन हे फारच कमी आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा सेविका, गटप्रवर्तक यांनी आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिले होते. तेव्हा आरोग्य मंत्र्यांनी आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात तीनपट वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र अद्यापही त्याची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तकांमध्ये असंतोष आहे. आशा व गटप्रवर्तकांना १८ हजार रुपये मानधन, सेवानिवृत्तीनंतर ५ हजार रुपये पेशंन, उपकेंद्रात स्वतंत्र खोली आणि हजेरी बुक देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरुपी राबविण्यात यावे,जननी सुरक्षा योजनेतील लाभासाठी दारिद्रय रेषेची अट रद्द करा, ७ आॅक्टोबर २०१७ रोजी केंद्र सरकारच्या जीआरनुसार आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना ५ टक्के मानधन वाढ व १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय झाला आहे. तो निर्णय गटप्रवर्तकांना लागू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात संघटन सचिव चरणदास भावे, उपाध्यक्ष करुणा गणविर, उपाध्यक्ष कल्पना डोंगरे, अध्यक्ष पुस्तकला रहांगडाले, गीता उके, रेखा हरिणखेडे, रेणुका राऊत, जयश्री तुरकर, संधिकार साखरे, सविता मेश्राम, दुर्गा धांडे, अनिता अंबुले, मुनेश्वर बिसेन, प्रमिला बिसेन, मंगला बहेकार, पुष्पा बहेकार, रिना ब्राम्हणकर, गायत्री रहांगडाले, भारती काळबांडे, माया कोरे, सविता मानकर, मुनेश्वरी कावळे, किसमोनी नागपुरे, शिला टेंभरे, अर्चना वासनिक, सुरेखा पारधी, मिनाक्षी पाटील, वर्षा पंचभाई, गीता भेंडारकर, निवृत्ता पंचभाई, मीना मेश्राम, मंदा शिवणकर, वर्षा वंजारी, वनिता कुंभरे, प्रमिला कानेकर, सीमा मेश्राम, संघमित्रा मेश्राम, शोभा वाघाये, शिला पंधरे, गीता आंबेडारे, चित्रा कोरे, पौर्णिमा बन्सोड, पूनम पटले, रेखा गजभिये, सत्यभामा दोनोडे, दिप्ती ब्राम्हणकर, सीमा चौरे, माधुरी आकरे, उषा लांजेवार, गुणवंता कटरे,बिंदू शेंडे, जया हुमने, शोभा राऊत, अनिता बिसेन, सुमित्रा दास, चांदणी मेश्राम यांचा समावेश होता.
आशा सेविका, गटप्रवर्तकांचा जि.प.वर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:23 PM
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आशा सेविका आणि गटप्रवर्तक मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात मानधन तत्वावर कार्यरत आहेत. तुटपुंज्या ...
ठळक मुद्देमानधनात वाढ करण्याची मागणी : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, जिल्हाभरातील सेविकांचा समावेश