शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

आशा सेविका बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 5:00 AM

मागील वर्षभर कोरोना संसर्गाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या ७२ हजार आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही काेरोनाच्या कामापोटी दिलेली नाही. केंद्र सरकारकडून कोरोना भत्ता म्हणून महिन्याला १००० रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जातात. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर  आदी मिळाले. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते तर काही ठिकाणी अर्धवट वस्तू देत होते. 

ठळक मुद्देधोका पत्करुन दिली सेवा : ३५ रुपये मजुरीवर राबविले जाते

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोना संसर्गाच्या काळात आरोग्य सर्वेक्षण ते रुग्णांची सेवा करण्याचे काम आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून केले. मात्र अद्यापही आशा सेविकांना मानधन देण्यात आले नाही. केवळ ३५ रुपये मजुरीवर त्यांना राबवून घेतले जात आहे. त्यामुळे या विरोधात राज्यभरातील आशा सेविकांनी एकत्र येत मंगळवारपासून (दि.१५) बेमुदत संपावर गेले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षभर कोरोना संसर्गाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या ७२ हजार आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही काेरोनाच्या कामापोटी दिलेली नाही. केंद्र सरकारकडून कोरोना भत्ता म्हणून महिन्याला १००० रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जातात. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर  आदी मिळाले. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते तर काही ठिकाणी अर्धवट वस्तू देत होते. आशा सेविका घरोघरी जाऊन पल्स ऑक्सिमीटर, ताप मोजण्यापासून आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी करतात. एका आशाला किमान ५० घर रोज करावी लागतात. याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्ण तपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात. साधारणपणे ८ ते १२ तास काम करून घेतले जाते. त्याबद्दल महिन्याकाठी १००० रुपये म्हणजे रोज ३५ रुपये दिले जातात. आशांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची कोणतीच जबाबदारी सरकार घेत नाही. आशा व कुटुंबीयांना कोणतेही विमा कवच, आरोग्य संरक्षण नाही, आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जाते.आशांना कोरोना काळात केलेल्या कामाचे किमान १८ हजार रुपये मासिक वेतन मिळाले पाहिजे.  कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी. आशा सेविकांनी गेले वर्षभर कोणतीही तक्रार न करता कोरोनाची सर्व कामे केली. सनदशीर मार्गाने संघटनेने मागण्यांची निवेदने दिली. मात्र सरकारने आशांच्या निवेदनांना फुटक्या कवडीचीही किंमत न दिल्यामुळेच बेमुदत संप करण्याची वेळ आल्याचे आशा सेविकांनी म्हटले आहे. याच सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयटकचे हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वात आशा सेविकांनी मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. 

आशां सेविकांवर ७२ कामांचा भार - आशांना ७२ प्रकारच्या आरोग्य कामांसाठी सरकारकडून ४ हजार अधिक कामानुसार अडीच ते साडेतीन हजार रुपये दिले जातात. कोरोना काळात कोरोनाच्या कामांमुळे आरोग्याची अन्य कामे करणे शक्य नव्हते. सरकारने म्हणजे आरोग्य विभागाने यासाठी अडीच ते साडेतीन हजार रुपये दिले नाहीत. काेरोनाच्या आठ ते बारा तासाच्या कामांसाठी एक रुपयाही आजपर्यंत दिलेला नाही. नियमानुसार काेरोनापूर्व काळात आरोग्याचे काम आठवड्यातून चार दिवस व रोज दोन ते चार तास करणे बंधनकारक होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनStrikeसंप