केंद्र शासनाकडून ९.१७ लाख मंजूर : जिल्ह्यातील १,११४ कर्मचाऱ्यांना लाभ, आरोग्य संचालकांची सीईओंना सूचनादेवानंद शहारे गोंदियामहिलांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कठिण परिश्रम करणाऱ्या आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने राज्य शासनाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत विमा काढण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात कार्यरत एक हजार १०७ आशा स्वयंसेविका व सात गट प्रवर्तकांना याचा लाभ मिळणार आहे.राज्यात आशा स्वयंसेविका योजना सुरू करण्यास प्रारूपाला केंद्र सरकारद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. यात आशा स्वयंसेविकांना वेळोवेळी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयात रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी स्थानिक वाहनाने ये-जा करावी लागते. या सेवेदरम्यान स्वयंसेविकांच्या मृत्यूची घटना यापूर्वी घडली आहे व त्या घटनेमुळेच सदर निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारद्वारे राज्यात आशा स्वयंसेविका योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या प्रारूपानुसार, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्यासाठी ९.१७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून नियुक्त सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना विम्याचा लाभ मिळू शकेल. १८ ते ७० वर्षाच्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा विमा काढण्यात येणार आहे. यासाठी आशाचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकासह संलग्न करणे गरजेचे आहे. बँक खाते नसल्यास आधारकार्डची प्रत जमा करून विमा काढला जावू शकेल. दरवर्षीचे प्रीमियम १२ रूपये आहे. ही रक्कम आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यातून कपात केली जाईल. असा मिळेल लाभविमाकर्ता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांची मदत दिली जाईल. दोन्ही डोळ्यांना क्षति झाल्यास किंवा डोळा खराब झाल्यास, दोन्ही हातांना क्षति झाल्यास किंवा पाय क्षतिग्रस्त झाल्यावरही एवढीच मदत दिली जाईल. एक डोळा खराब झाल्यास किंवा एक हात किंवा एका पायाची हानी झाल्यास एक लाख रूपयांची मदत दिली जाईल. यासाठी घेण्यात आला निर्णयधुळे येथील रस्ता अपघातात सात आशा स्वयंसेविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आधारावर केंद्र शासनाद्वारे आशा स्वयंसेविका योजना या वर्षापासून राज्यात लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात एक हजार ११५ आशा स्वयंसेविकांची पदे आहेत. यात एक हजार १०७ कार्यरत आहेत. तसेच सात गट प्रवर्तक कार्यरत आहेत. सर्वांचा विमा काढण्यात येणार आहे.
आशा सेविकांना मिळणार दोन लाखांचा विमा
By admin | Published: September 17, 2016 2:09 AM