सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी घेण्यात आलेल्या लसीकरण जनजागृती काव्य गायन स्पर्धेत अस्मिता पंचभाई हिने प्रथम तर सुनील सिंगाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कोरोना लसीकरण जनजागृती काव्य गायन स्पर्धा दिनांक १५ ते २५ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यात गोंदियासह संपूर्ण महाराष्ट्रातील १९ स्पर्धकांनी भाग घेतला व संघटनेच्या माध्यमातून व्हिडिओंचा प्रचार-प्रसार करण्यात आला. तब्बल ३५ हजार लोकांनी १० दिवसांत व्हिडिओ बघितले. निश्चितच व्हिडिओंच्या माध्यमातून लसीकरण संदर्भातील गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. स्पर्धकांना मिळालेल्या लाइक्सच्या आधारावर प्रथम क्रमांक अस्मिता पंचभाई, द्वितीय क्रमांक सुनील सिंगाडे, तृतीय क्रमांक सुधीर खोब्रागडे, चौथा क्रमांक मनोज गेडाम, पाचवा क्रमांक एम. वाय. मेश्राम, सहावा क्रमांक दीक्षांत धारगाये, सातवा क्रमांक जे. एम. टेंभरे यांना देण्यात आला, तर प्रोत्साहन स्वरूपात उमेश रहांगडाले, सुनंदा किरसान, सत्यवान गजभिये, यज्ञराज रामटेके, सुरेश बोंबोर्डे, भारती तिडके, संगीता रामटेके, देवेंद्र नाकाडे, नामदेव पटणे, किरण कावळे, लक्ष्मण आंधळे, पुंडलिक हटवार यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात येईल. स्पर्धेसाठी मनोज दीक्षित, जिल्हा मार्गदर्शक एल. यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच. चौधरी, संदीप तिडके विनोद बडोले, पी. आर. पारधी, वाय. पी. लांजेवार, मुकेश रहांगडाले, कैलास हांडगे, एन. बी. बिसेन, प्रदीप रंगारी, सुरेश कश्यप, उमेश रहांगडाले, एस. केसाळे, टी. आर. लिल्हारे, गौतम बान्ते, सुनील बावनकर, मिथुन चव्हाण, विशाल कच्छवाय, वर्षा बडवाईक, ज्योती डाबरे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.