गोंदिया : दारूचा व्यवसाय करू नका, असे म्हणणाऱ्या इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन बापलेकांना जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे. ही सुनावणी शुक्रवारी करण्यात आली.आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनगावच्या वॉर्ड क्र. ३ येथील आरोपी चंद्रकांत नानाजी शिंगाडे (३७), नानाजी हगरू शिंगाडे (६२) व सुर्यकांत नानाजी शिंगाडे (४१) हे तिघेही दारूविक्री करीत असल्याने गावाचे वातावरण दूषित होत होते. घराजवळ दारूविक्री होत असल्याने घराजवळचे चंद्रकला कनोजे व सुभाष कनोजे यांनी त्यांच्या दारूविक्रीला विरोध केला. हे भांडण गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या दालनात गेले होते. त्यावेळचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देशमुख नागभिडे यांनी दोन्ही पक्षाला भांडण करू नका असे सांगितले. परंतु दोन्ही पक्ष शांत बसले नाही. सायंकाळी पुन्हा त्या दोन्ही पक्षात वाद झाला. आरोपी नानाजी हगरू शिंगाडे (६२) व सुर्यकांत नानाजी शिंगाडे (४१) सुभाष श्रीचंद कनोजे (५३) यांना पकडून ठेवून आरोपी चंद्रकांत याने कात्रीने सपासप कुशीवर, पाठीवर घाव घालून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना ३० आॅगस्ट २०११ रोजी सायंकाळी ७.२० वाजतादरम्यान घडली होती.
खुनाच्या प्रयत्न; तिघांना कारावासदारूविक्री प्रकरण : तंटामुक्तीच्या सभेनंतर झाला होता वाद
By admin | Published: August 01, 2015 2:09 AM