पाठराखण : गोरेगाव ठाण्यातील प्रकारगोंदिया : गोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेवर तेथील सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला १२ दिवस उलटले. मात्र त्या सहाय्यक फौजदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गेल्या ९ आॅगस्टच्या रात्री पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी महिलेवर सहाय्यक फौजदार ग्यानिराम जिभकाटे (बक्कल नं.९९) याने बळजबरीचा प्रयत्न केला. मात्र गोरेगाव पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला नाही. ठाणेदार कदम यांनी पोलीस अधीक्षकांना माहिती दिल्यावर त्यांनी निलंबनाचा प्रस्ताव पाठवा अशा सूचना दिल्या, परंतु पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास अजूनही टाळाटाळ केली जात आहे. खुनाच्या प्रकरणात ६ आॅगस्ट २०१६ रोजी अटक झालेल्या त्या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. ती महिला ठाण्यात एका खोलीत असताना रात्रीच्या वेळी सदर सहायक फौजदाराने त्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बळजबरीचा प्रयत्न केला होता. मात्र कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांमुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यावर निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ सहाय्यक फौजदारावर अजून गुन्हा दाखल नाही
By admin | Published: August 22, 2016 12:07 AM