शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जुनी पेन्शनसाठी पालकमंत्र्यांच्या घरावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाºयांना जूनी पेंशन योजना लागू ...

ठळक मुद्देनो पेंशन, नो वोट : कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाºयांना जूनी पेंशन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या घरावर कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.२७ ) हल्लाबोल आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री बडोले यांना दिले.महाराष्ट्रात मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या जूनी पेंशन लढ्याची शासनाकडून अवहेलना केली जात आहे महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटना महाराष्ट्रात मजबूत आहे. संघटनेची बांधणी प्रत्येक तालुक्यात आहे. याच जोरावर आजवर नागपूर, मुंबई येथे राजव्यापी आंदोलने करण्यात आली. परंतु शासनाकडून आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. म्हणून पुन्हा एकदा कर्मचाºयांनी जो जूनी पेंशन देण्याच्या मनस्थितीत असेल त्यांचाच यापुढे विचार करायचा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी नो पेंशन नो वोट ही मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत हजारो डिसीपीएस, एनपीएसधारक कर्मचारी सेवेत असताना मृत्युमुखी पडले. मात्र त्यांच्या वारसानांना कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांच्या कुटुंबाला शासनाने वाºयावर सोडले आहे.अशा कुटुंबांना फॅमीली पेंशन, ग्रॅच्युटी लागू करावी. एकीकडे आणिबाणीत कारावास भोगलेल्यांना पेंशन, लोकप्रतिनिधींना पेंशन व मुळात जूनी पेंशन ही त्या कर्मचाऱ्याने आयुष्यभर केलेल्या सेवेच्या उतारवयात मिळणारे फळ असताना तो नाकारण्याचा अधिकार शासनाला आहे का असा सवाल कर्मचाºयांनी उपस्थित केला आहे.शासनाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. तर सरसकट कर्मचाºयांच्या हक्काची जूनी पेंशन योजना सुरू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचाºयांनी रविवारी (दि.२७) पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या घरावर हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलनात राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष राज कडव, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप सोमवंशी, सचिव सचिन राठोड, प्रविण सरगर, मुकेश रहांगडाले, किशोर डोंगरवार, हितेश रहांगडाले, चंदु दुर्गे, सुनील चौरागडे, शितल कनपटे, सुभाष सोनेवाने, जीवन म्हशाखेत्री, भूषण लोहारे, चिंतामन वलथरे, विनोद गहाणे, संजय उके, हुमेंद्र चांदेवार, शालीक कठाणे, अजित रामटेके, अजय तितिरमारे, अनमोल उके, अमोल खंडाईत, रवी काशिवार, विलास लंजे, गणेश कांगणे, मंगेश जांभूळकर, एकनाथ लंजे, विजेंद्र केवट, सचिन सांगोळे, गणेश सिंगणजुडे, अविनाश पाटील, सोहन कापगते, रामेश्वर गोंडाणे यांचा समवेश होता.

टॅग्स :Morchaमोर्चाRajkumar Badoleराजकुमार बडोले