लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर येथील वाडी परिसरात आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करून त्यांच्या कारच्या काच फोडण्यात आल्या. या घटनेचा येथील युवा स्वाभीमान संघटनेने निषेध व्यक्त करीत जयस्तंभ चौकात उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शिवसेनाविरोधी नारेबाजी केली.आमदार राणा मुंबईवरून नागपूर विमानतळावर येणार असल्याने त्यांचे खासगी सहायक युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह त्यांना घेण्यासाठी गेले होते. अमरावतीकडे जात असताना वाडी परिसरात दोन अज्ञात हल्लेखोर त्यांच्या गाडीचे काच फोडून पसार झाले. प्रकरणी आमदार राणा यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त करीत पोलिसांत तक्रार केली. या घटनेचा येथील युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.यासाठी येथील जयस्तंभ चौकात सायंकाळी उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा व टायरचे दहन करण्यात आले.याप्रसंगी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, महासचिव जीवन शरणागत, जगदीश रहांगडाले, मनीष गोंडाणे, कमलेश राणे, रमेश रिनायत, होमेंद्र पटले, पंकज वंजारी, तुषार गडपायले, सिद्धांत मेश्राम, अनमोल माने, सतीष राणे, देवेंद्र डोंगरे, श्रेयस सतदेवे, शेखर गजभिये, सार्थक खोब्रागडे, सोनू भोयर, पप्पू राणे, अमित राणे, संदीप शरणागत, शुभम मेश्राम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राणांवरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:20 AM
नागपूर येथील वाडी परिसरात आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करून त्यांच्या कारच्या काच फोडण्यात आल्या. या घटनेचा येथील युवा स्वाभीमान संघटनेने निषेध व्यक्त करीत....
ठळक मुद्देउद्धव ठाकरेंचा पुतळा जाळला : शिवसेनाविरोधी नारेबाजी