तिरोडा : संपूर्ण जग मागील वर्षभरापासून कोरोनाशी संघर्ष करीत आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने जगातील प्रत्येक क्षेत्रावर मोठा वाईट परिणाम झाला आहे. यात शिक्षण क्षेत्रालाही बाधा निर्माण झाली. परंतु, तिरोडा येथील मेरिटोरियस पब्लिक शाळेने आपल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीने या संकटाच्या स्थितीत हार न मानता संपूर्ण वर्षभर निरंतर ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य केले आहे. शासनाच्या आदेशाने कोरोना काळात राबविलेल्या शैक्षणिक कार्यात ही शाळा भौतिक स्वरूपात जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.
मेरिटोरियस पब्लिक शाळेत केवळ अध्यापनाचेच कार्य करण्यात आले नाही, तर विद्यार्थ्यांची सतत गुगल फॉर्मच्या साहाय्यतेने ऑनलाईन परीक्षासुद्धा घेण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांनी शंभर टक्के सहकार्य केले. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धांचे आयोजन केले होते. यात चित्रकला, नृत्य, गायन, भाषण, अंताक्षरी, काव्यपाठ यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात आले. शाळेने विद्यार्थ्यांच्या सोबतच पालकांसाठी सुद्धा ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले व ई-प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. शासनाद्वारे परवानगी मिळाल्यावर पूर्णपणे कोरोना नियमांचे पालन करीत शाळेने यशस्वीरीत्या २३ नोव्हेंबर ते ६ एप्रिलपर्यंत जवळपास ११९ दिवस नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग संचालित केले. तसेच ८ डिसेंबर ते ६ एप्रिलपर्यंत जवळपास ९३ दिवस शाळा संचालित करून अध्यापन व शैक्षणिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यात आले.
कोट
ग्रामीण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व निरंतर शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हा शाळा व्यवस्थापनाचा उद्देश आहे. यात चांगल्या प्रमाणात शाळा यशस्वीसुद्धा ठरली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
-मुकेश अग्रवाल, शाळा संस्थापक.