गोंदिया : लोकमत बालविकास मंच, शारदा कान्व्हेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्तवतीने रविवारी (दि.९) जिल्हास्तरीय बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. बाल महोत्सवात एकल नृत्य व समूह नृत्य अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. या महोत्सवात देशभक्तीपर विविध सादरीकरण विद्यार्थ्यांनी सादर केले.प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात, पण त्यांना सादर करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. त्यामुळे अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची प्रेरणा मिळते. अशा इच्छेला पूर्णत्वास आणण्याची महत्वाची जबाबदारी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने नियमित जपली आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्राने समाजातील प्रत्येक घटकाशी जुळता यावे, यासाठी ‘लोकमत’ बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच असे महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.‘लोकमत’ बाल विकास मंचच्या व्यासपीठावरून बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने बालक-पालक व शाळांच्या पुढाकाराने येथील केमिस्ट भवनमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत बालमहोत्सव पार पडले.जिल्हास्तरीय बालमहोत्सव-२०२० ची सुरूवात देवी सरस्वती व ‘लोकमत’चे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून झाली. यावेळी भूवनकुमार बिसेन, शारदा कॉन्व्हेंटच्या संचालिका योगिता बिसेन, विष्णु चाचेरे, कृष्णा, लोकमतचे कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्स्ना शहारे व प्रकाश वलथरे प्रामुख्याने उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षक म्हणून विष्णू चाचेरे व कृष्णा उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धांचे निरीक्षण व परीक्षण करून स्पर्धा सादरीकरणावर गुण देवून क्रमांक जाहीर केले.जिल्ह्यातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून या बालमहोत्सवाला चार चांद लावले. ज्यात विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या. सहभागी स्पर्धकांनी आपापल्या शाळांचे प्रतिनिधित्व करीत क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न पणास लावला. बाल महोत्सवात एकल नृत्य व समूह नृत्य घेण्यात आले. स्पर्धेत जवळपास २५० विद्यार्थ्यांनी एकल व समुह नृत्य सादर केले. विशेष म्हणजे, या महोत्सवाला अक्षरा रामरख्यानी, मानसी वाघाडे, अंतरा कावळे, अपूर्वा भाष्कर, लावण्या शिवणकर, त्रिवेणी कावळे यासारख्या लहान-लहान बालकांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.संचालन करून आभार लोकमत इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रमोद बागडे, विलास इटनकर, निशांत मेश्राम, राजू हूड, प्रकाश वलथरे, संतोष बिलोने व पवन ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.
‘आंटी नंबर १’ पोहोचली महोत्सवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 5:00 AM
प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात, पण त्यांना सादर करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. त्यामुळे अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची प्रेरणा मिळते. अशा इच्छेला पूर्णत्वास आणण्याची महत्वाची जबाबदारी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने नियमित जपली आहे.
ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी : जिल्ह्यातील विविध शाळांचा सहभाग, बाल गुणांचा अविष्कार