शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
3
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
4
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
5
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
6
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
7
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
8
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
9
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
10
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
11
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
12
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
13
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
14
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
15
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
16
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
17
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
18
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
19
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
20
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक

सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2015 1:52 AM

जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

गोंदिया : जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीवर शेतकऱ्यांना २५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे २३ कोटी ३५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मात्र हे अनुदान खरीप हंगामाच्या सुरूवातीला मिळण्याची आशा मंदावली आहे. शेतकऱ्यांना आवश्यकता असते त्यावेळी हा पैसा मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींमार्फत जिल्ह्यात विविध धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना ४७ आणि आदिवासी विकास महामंडळाला ४० अशी एकूण ८७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली होती. खरेदी केलेल्या धानाचे अनुदान तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, रावणवाडी, धापेवाडा, दासगाव, टेमणी, आसोली, कोचेवाही, कामठा, मजीपूर, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कालीमाटी, तेढा, कुऱ्हाडी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव येथील तीन धान खरेदी केंद्र, नवेगावबांध, महागाव, वडेगाव (स्टेशन), धाबेटेकडी, भिवखिडकी, आमगाव तालुक्यातील आमगाव व गोरठा, सालेकसा तालुक्यातील कोटजंभोरा, तिरोडा तालुक्यातील बघोली, भिवापूर, तिरोडा, ठाणेगाव, मेंढा, मुंडीकोटा, चिखली, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, बाम्हणी, मुरपार, पांढरी हे केंद्र सुरू असून तिरोडा तालुक्यातील वडेगाव, येडमाकोट, नवेझरी व विहिरगाव येथील धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक नसल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)