लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनात बसलेले योजना बनवितात व त्या योजना लागू करणारे अधिकारी योजनांना कार्यान्वीत करण्याबाबत उदासिन असून भ्रष्टाचारात लिप्त आहेत. जनता दरबाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दैनंदिन जिवनात येत असलेल्या समस्या दिसून येत आहेत. सर्वसामान्यांना त्रास देणे अधिकाºयांनी थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असा इशारा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.तालुक्यातील ग्राम कामठा येथे आयोजीत जनता दरबारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंंढे होत्या. याप्रसंगी जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचला पाहिजे. शासकीय योजनांच्या अनियमिततेसाठी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगीतले. जनता दरबारात घरकूल बांधकामाचे अनुदान, ७/१२ तील त्रुट्यांची दुरूस्ती, संजय गांधी निराधारा-श्रावणबाळ योजनांची मासीक पेंशन, बीपीएल परिवारातील सदस्य संख्या वाढूनही अतिरीक्त धान्य न देणे, बाघ प्रकल्पाच्या कालव्यांची सफाई व पाणी वाटपात अनियमितता, विद्याथिर्नींना सायकल मंजूरी, आंगणवाडी सेविका प्रक्रीया पूर्ण होऊनही लंबाटोला येथील उमेदवारास नियुक्ती पत्र न देणे, ग्राम झिलमीली येथे पेयजल पूर्ती योजनेत भ्रष्टाचार आदि तक्रारी नागरिकांनी मांडल्या. नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदार अग्रवाल यांनी संबंधीतांना कारवाईचे निर्देश दिले.सभेला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जिल्हा परिषद सदस्य विजय लोणारे, पंचायत समिती सदस्य शंकर नारनवरे, सरपंच कल्पना खरकाटे, प्रकाश डहाट, चमन बिसेन, सावलराम महारवाडे, संतोष घरसेले, सत्यम बहेकार, हुकूम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, संजय अग्रवाल, भूवसिंह सोलंकी, राजेंद्र आसोले, राधेश्याम पाटील, रूपचंद मलगाम, छुनू खरकाटे, गिरधारी बघेले, डॉ. गिरेपूंजे, डेलीराम हुमने, हरी सिंहमारे, मुन्ना मेश्राम, नारायण जगणे, मारोती दरोई, डोडी हरिणखेडे, लक्ष्मण तावाडे, केशव तावाडे, राधेश्याम पटले, नितीन तूरकर, गमचंद तूरकर, सुनील राऊत, फागूसिंह मुंडेले, जगदीश पारधी, कूवर हरिणखेडे, मनोहर भावे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.
सर्वसामान्यांना त्रास देणे अधिकाºयांनी थांबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:39 AM
शासनात बसलेले योजना बनवितात व त्या योजना लागू करणारे अधिकारी योजनांना कार्यान्वीत करण्याबाबत उदासिन असून भ्रष्टाचारात लिप्त आहेत.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जनता दरबारात दिला कारवाईचा इशारा