लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्या वतीने मंगळवार (दि.९) पासून बेमुदत राज्यव्यापी आॅटोरिक्षा व टॅक्सी बंद पुकारण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना व जिल्हा काळीपिवळी परमीट टॅक्सी मालक चालक असोसिएशनच्या वतीने या बंदला समर्थन दिले आहे.आॅटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष सतीश समुद्रे व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष गोविंद तिडके यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता जयशस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आॅटोचे खुले परमीट बंद करण्यात यावे, आॅटोचालक कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी व्हावी, वाहन विमाचे दर कमी करण्यात यावे, ओला व उबेर कंपनी बंद करा, अवैध प्रवासी वाहतूक बंद करणे, चालकाला जनसेवकाचा दर्जा मिळावा, जिल्हास्तरीय आरटीए कमिटीवर संघटनेच्या एका प्रतिनिधीला नियुक्ती देण्यात यावी, जयस्तंभ चौकात सुलभ शौचालय तयार करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
आॅटोरिक्षा व टॅक्सी चालकांचा आजपासून बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 10:07 PM