लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे. असे मार्मीक उद्गार आंबेडकरी कवीसंमेलनाचे अध्यक्ष, लघु चित्रपट निर्माता व प्रसिद्ध कवी नागेश वाहुरवाघ यांनी केले.येरांडी येथे रविवारी पार पडलेल्या पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कविता सादर करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे छत्तीसगडचे डब्ल्यू.कपूर, यवतमाळचे गझलकार रमेश बुरबुरे, पंढरपूरच्या स्वाती बंगाळे, नागपूरचे कवि संजय गोडघाटे, लिलाधर गायकवाड, डॉ.माधवी झोडे, वैभव ओगले, ब्रम्हपुरीच्या डॉ.सुकेसिनी बोरकर, गौतम राऊत, आमगावच्या प्रियंका रामटेके, आवळगावचे अमरदीप लोखंडे, गडचिरोलीचे खेमदेव हस्ते, सौंदडचे अनिल मेश्राम, खेमराज भोयर, माणिक गेडाम, बापू इलमकर, शैलेंद्र बोरकर, एकनाथ बुद्धे उपस्थिती होते.संमेलनाचे आयोजन लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेनी केले होते. संचालन मंगेश जनबंधू तर आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कवि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निवेश बोरकर, नितीन तागडे, धम्मदीप मेश्राम, पराग फुलेकर, अश्विन फुलेकर, उल्हास रामटेके, सुमित गणवीर यांनी सहकार्य केले.
बाबासाहेबच जीवनाचे एक महाकाव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:00 AM
सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच्या जीवनाचे एक महाकाव्य आहे.
ठळक मुद्देनागेश वाहुरवाघ : आंबेडकरी कवीसंमेलन उत्साहात पार पडले