शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बाबासाहेबांनी प्रत्येकाला न्याय मिळवून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:47 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेला नष्ट केले. या देशातील प्रत्येक व्यक्ती समान आहे त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि सन्मान मिळवून दिला,....

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आंतरराज्यीय धम्म संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेला नष्ट केले. या देशातील प्रत्येक व्यक्ती समान आहे त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळताच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि सन्मान मिळवून दिला, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात १४ जानेवारी रोजी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार संजय पुराम, माजी आ. दिलीप बन्सोड, डॉ. मोहनलाल पाटील, माजी आ. रामरतनबापू राऊत, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स. सभापती वंदना बोरकर, उपसभापती दिलीप वाघमारे, जयप्रकाश शिवणकर, नागपूरचे नितीन गजभिये, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, सुखराम फुंडे, प्राचार्य महेंद्र मेश्राम, पं.स. सदस्य छबू उके, रतन वासनिक, अ‍ॅड. एस.डी. बागडे, महेंद्र मडामे, उत्तम नंदेश्वर, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, संस्थापक सचिव यादव मेश्राम उपस्थित होते.यावेळी आ. पुराम, माजी आ. बंसोड, रामरतन राऊत, नरेश माहेश्वरी व विश्वजीत डोंगरे यांनी समायोचित मार्गदर्शन केले.प्रास्ताविक यादव मेश्राम यांनी मांडले. संचालन रमण हुमे व राकेश रामटेके यांनी केले. आभार जनार्धन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी, भीम गर्जना संघटनेचे पदाधिकारी, भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारी व समाजाच्या सर्व संघटना व समाज बांधवांनी सहकार्य केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकार्यक्रमात समितीच्यावतीने समितीचे संस्थापक सचिव यादव मेश्राम, रायपूरचे महेंद्र मडामे, बुद्धमूर्ति विक्रेत्या हिरण राऊत, रंजिता सुरेंद्र खोब्रागडे यांचा तसेच दिवंगत बोधनदास रामटेके यांच्या स्मृतित १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत बौद्ध समाजातील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, ‘भगवान बुद्ध व त्यांचा धम्म’ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले