नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात युती शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अमंलबजावणी गोंदिया जिल्ह्यात काही प्रमाणात झाली. त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३१ हजार ५४१ बालकांच्या दप्तरांची तपासणी केली असता ३० हजार १७८ बालकांचे दप्तर शासनाच्या निकषानुसार कमी वजनाचे असल्याचे आढळले. १३६३ विद्यार्थ्यांचे म्हणजेच ४.३२ टक्के विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन जडच असल्याचे आढळले.खासगी शाळांमध्ये आवश्यक त्या उपाय योजना सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने शाळांमध्ये पुस्तके,खेळाचे साहित्य, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केल्याने पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्यातून बच्चे कंपनी मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. परंतु १०० टक्के विद्यार्थी दप्तराच्या ओझ्यातून मुक्त झाले नाहीत.पाठीवर मोठे दप्तर, खांद्याला पाण्याची बॉटली, दुसऱ्या खांद्याला बॅट किंवा बॅडमिंटन रॅकेट अश्या अवस्थेत विद्यार्थी आपल्याला सर्रास दिसतात. त्या दृष्टीने शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्याचे दप्तर हे दररोज पाठीवरून घेऊन जाण्याच्या दैनंदिन उपक्रमामुळे विद्यार्थीही त्रस्त झाले होते.दप्तरात पाठ्यपुस्तके, वह्या, मोठ्या वह्या, प्रयोगवह्या, अनावश्यक लेखन साहित्य, चित्रकला साहित्य, शब्दकोष,रायटींग पॅड, गाईड्स, शिकवणीचे दप्तर, स्वाध्याय पुस्तीका, श्ष्यिवृत्ती पुस्तके कंपास बॉक्स, पाण्याची बॉटली, खाऊचा डबा, स्वेटर, खेळाचे साहित्य असे अनेक साहित्य दप्तरात राहात असल्याने दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांच्या पाठीच्या मनक्याच्या आजारात वाढ झाली होती.विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंददायी शिक्षण देण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने पालक व शाळांनाही सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा जास्त दप्तराचे वजन असून नये असे आदेश शासनाचे असून त्या दिशेने पाऊल उचलले आहे.आमगाव तालुक्यातील १ हजार ४५२, तिरोडा १९८३४, देवरी ४०, गोरेगाव १३७०, सडक-अर्जुनी ३२८२, सालेकसा १२०, अर्जुनी-मोरगाव २२६ व गोंदिया ३८५४ बालकांचे दप्तर शासनाच्या निकषानुसार वजनाचे आहेत. तर अधिक दप्तराचे वजन असलेले बालक तिरोडा तालुक्यात ८३८, सडक-अर्जुनी ३०३, आमगाव ३८ तर गोंदिया १८४ असे एकूण १३६३ बालकांचे दप्तराचे वजन त्या विद्यार्थ्यांच्या १० टक्यापेक्षा वजन अधिक असल्याचे आढळले.जड दप्तरांमुळे जडतात हे आजारजड दप्तरामुळे मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, मान दुखने, स्रायू आखडने, मणक्याची झिज होणे, थकवा, मानसिक तणाव अश्या व्याधींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते. या सर्व बाबीचा विचार करून युती सरकाने दप्तराचे ओझे कमी करण्याचा गांभीर्याने निर्णय घेतला.पालकांनो, अशी काळजी घ्याप्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा कमी आहे. याची काळजी घेणे, वह्यांची जाडी कमी करावी, मुलांच्या शाळेशी निगडीत सर्व साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी कपाट,रॅक, पेटीची व्यवस्था करावी, बॅग कमी वजनाची विकत घ्यावी.पालक व शाळांत समन्वय गरजेचा१)शिक्षकांनी गृहपाठाचे नियोजन करावे २) पहिली व दुसरीसाठी गृहपाठाच्या वह्यांची आवश्यकता नाही. ३) १०० पानापेक्षा मोठ्या व जाड कव्हर असलेल्या वह्यांची विद्यार्थ्याला सक्ती करू नये ४) जोड विषयांसाठी एकच वही वापरता येईल ५) शाळेत ग्रंथालयासारखे दप्तरालय सुरू करावे त्यात कपाट, हँगर्स, रॅकची व्यवस्था कारावी. ६) खेळाचे साहित्य शाळेतच उपलब्ध करून देण्यात यावे.७) शाळेत ई लर्निंगचा वापर करण्यात यावा,दप्तराचे ओझे वाढणार नाही. ८) शासनानेही दक्षता घेतली आहे, त्यानुसार ई पुस्तके उपलब्ध करावीत ९) दप्तराचे ओझे वाढल्याची तक्रार आल्यास वेळीच तपासणी करून त्यांना सूचना शाळांनी द्याव्यात.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 9:53 PM
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात युती शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अमंलबजावणी गोंदिया जिल्ह्यात काही प्रमाणात झाली. त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांची तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्दे१३६३ बालकांचे दप्तर वजनदार : शिक्षण विभागाचा अहवाल