परसवाडा : तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी गावातील महिलांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात अवैध धंदे करणाऱ्याला बोलावून ताकीद देऊन बंद केली. दारूबंदी महिला समिती गठीत करण्यात आली. यावेळी तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वसंत लबदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक अॅड. माधुरी रहांगडाले, इंद्रकला रहांगडाले, तंटामुक्त अध्यक्ष गणराज रहांगडाले, माजी सरपंच पवन पटले, दिलीप रहांगडाले, शोभा हजारे उपस्थित होते. ठाणेदार लबदे यांनी गावात शांतता, सुव्यवस्था व कुटूंब दारूमुळे उध्दवस्त होतात. महिलाना त्रास होतो. त्यामुळे गावात दारू बंदी असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणीही गावात दारूच्या आहारी जाऊ नये, असे ही सांगितले व असल्यास त्यांना पोलिसाच्या स्वाधीन करा, त्यासाठी आम्ही मदत करू असे महिलांना सांगितले. अॅड. माधुरी रहांगडाले यांनी ही महिलांना जागृत करून महिलात उत्साह निर्माण केला. कार्यक्रमात गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन आभार ग्रामसेवक ओ.के. रहांगडाले यांनी मानले. (वार्ताहर)
दारूबंदी करण्यासाठी पालडोंगरीत पुढाकार
By admin | Published: January 14, 2015 11:10 PM