शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:58 PM

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद बुधवारी (दि.३) तिस-या दिवशीही गोंदिया शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटले. शहरातील विविध संघटनातर्फे ठिकठिकाणी सभा घेऊन व रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देटायरची जाळपोळ : रॅली व मोर्चा काढून नोंदविला निषेध, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही उमटले पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद बुधवारी (दि.३) तिस-या दिवशीही गोंदिया शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटले. शहरातील विविध संघटनातर्फे ठिकठिकाणी सभा घेऊन व रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील आठही तालुक्यात ेबंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. येथील सर्व शाळा, महाविद्यालये व व्यावसायीक प्रतिष्ठाणे पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. बंदमुळे गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या ५०० बसफेºया रद्द करण्यात आल्या.बंद दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे गोंदिया शहराला पोलीस छावणीचे रुप आले होते.विविध आंबेडकरी संघटनानी बुधवारी गोंदिया शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शहरातील सर्व प्रमुख चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध संघटनाचे पदाधिकारी, सदस्य आणि आंबेडकरी समाजबांधव सकाळी ८ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी निषेध सभा घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम, भाकपचे मिलिंद गणवीर, अमित भालेराव, एच.आर.लाडे, युवक काँग्रेसचे संदीप ठाकूर, राष्ट्रवादीचे मनोहर वालदे, ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे खेमेंद्र कटरे, माजी.न.प.उपाध्यक्ष पंकज यादव, रिपब्लिक पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे भाऊ गजभिये, समता संग्राम परिषदेचे सतीश बन्सोड, दिपेन वासनिक, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे रतन वासनिक व काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, हंसू वासनिक, मधु बनसोड, अ‍ॅड. राजकुमार बोंम्बार्डे, डॉ. मिलींद राऊत, डी. एस. मेश्राम, अतुल सतदेवे,विलास राऊत, रामचंद पाटील, धनंजय वैद्य, भागवत मेश्राम, देवा रुसे, निलेश देशभ्रतार, यशपाल डोंगरे, वसंत गणवीर, शुध्दोदन शहारे, विनित शहारे, अशोक बेलेकर उपस्थित होते. उपस्थितांनी भीमा कोरेगाव येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तसेच सरकार आणि पोलीस प्रशासनाने यात हयगय केल्याचा आरोप केला. अशा घटनामुळे समाजातील वातावरण बिघडत असून हे टाळण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बहुजन समाज पक्षाच्यावतीने शहरात रॅली काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बसप कार्यकर्त्यानी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला. यावेळी विविध संघटनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देऊन या घटनेस जबाबदार असणाºयावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.टायरची जाळपोळ, रास्ता रोकोशहरातील नेहरु चौकात काही युवकांनी टायरची जाळपोळ करुन भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. तर गोरेगाव-ढिवरटोली मार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळापुरती ठप्प झाली होती.रॅली काढून नोंदविला निषेधबहुजन समाज पक्ष व विविध आंबेडकरी संघटनातर्फे शहरात मोटार सायकल रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. रॅलीमध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश होता. भीमा कोरेगाव येथील घटनेबाबत नेते बोलत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या.शाळा, महाविद्यालये व व्यापारी प्रतिष्ठाणे बंदविविध आंबेडकरी संघटनानी बुधवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे गोंदिया शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. तर शहरातील भाजीबाजार व व्यावसायीक प्रतिष्ठाणे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.जिल्ह्यातील ५०० बसफेऱ्या रद्दबंदच्या पार्श्वभूमिवर गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या बसफेºया सकाळी ७.३० वाजतानंतर रद्द करण्यात आल्या होत्या. दिवसभरात गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या एकूण ५०० बसफेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते.शालेय विद्यार्थ्यांना फटकाबुधवारी शाळा व महाविद्यालय बंद असल्याची पूर्व सूचना विद्यार्थ्याना मिळाली नव्हती. त्यामुळे सकाळी ७ वाजता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी बसने गोंदियाला आले होते. मात्र येथे आल्यानंतर शाळा व महाविद्यालय बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर परत जाण्यासाठी बसस्थानक गाठले. मात्र बसफेºया बंद असल्याने या विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली होती.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव