शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे

By admin | Published: April 21, 2016 2:12 AM

जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता

पालकमंत्री राजकुमार बडोले : खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गोंदिया : जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मागणीनुसार खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.सोमवारी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेताना सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, कृषी सहसंचालक घावडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समतीचे सभापती छाया दसरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी असताना बँकांनी सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात केवळ ४३ हजार ५६७ शेतकरी सभासदांना पीक कर्ज दिले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना बँकांनी पीक कर्ज द्यावे. बँकांचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी चांगले बोलत नसून शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यात कुचराई करतात. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. सिंचन विभागाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनासाठी व ग्रामस्थांना पिण्यासाठी योग्यप्रकारे पाणी द्यावे. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढली पाहिजे, यासाठी लघु पाटबंधारे तलावांच्या दुरु स्तीचा कार्यक्र म हाती घ्यावा. कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी भरारी पथके तयार करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जास्तीत जास्त प्रमाणात खते उपलब्ध करु न द्यावी. तूर पीक लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. भाजीपाला शेतीकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्ग वळला पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना कृषी पंपाची जोडणी करून द्यावी असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषी पंप जोडणेसाठी निश्चित आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पंतप्रधान पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी या योजनेची माहिती कृषी विभागाने प्रत्येक गावात द्यावी. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तालुका पातळीवर शिबिरातून व ग्रामसभेतून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना द्यावी, असेही पालकमंत्री बडोले म्हणाले. आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करावा. श्री पद्धतीने धान लागवड करण्यास तसेच भाजीपाला पिके घेण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सन २०१५-१६ या वर्षात खरीप पेरणी १ लाख ९९ हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल आणि प्रमाणित खासगी कंपन्यांकडून १४ हजार ०५० क्विंटल अशी एकूण ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खताची मागणी ६० हजार मेट्रिक टन केली असता ६० हजार ७०० मेट्रिक टन खते मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा उपनिबंधक अहेर यांनी पीक कर्ज वाटप, वीज वितरण कंपनीचे चव्हाण यांनी कृषी पंपाना वीज जोडणी, सिंचन प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनाबाबत छप्परघरे यांनी माहिती दिली. सभेला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, सिंचन, पाटबंधारे व मध्यम प्रकल्पाचे अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. संचालन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांनी केले. आभार भोपळे यांनी मानले. (प्रतिनिधी)