निवडणूक कार्यक्रम जाहीर : निवडणूक रिंगणात दोन पॅनेल बाराभाटी : स्थानिक ठिकाणी पाच वर्षे झाल्यानंतर आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक होत आहे. सदर निवडणूक १८ सप्टेंबरला संस्थेत होणार आहे. यामध्ये दोन पॅनेलमध्ये निवडणूक रंगणार आहे.तालुका अर्जुनी मोरगावमधील बाराभाटी संस्थेची निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. यासाठी उमेदवार लगबगीने मतदारांसाठी काम जोरात सुरु आहे. प्रथम गटाची शेतकरी विकास पॅनल असून यात सर्वसाधारण आदिवासी कर्जदार गटाचे उमेदवार लिलाधर हरिभाऊ ताराम, श्रीराम ताराम, ईश्वरदास सखाराम प्रधान, रमेश संपत प्रधान, निलकंठ नारायण देव्हारे, केवळराम आराराम भंडारी; सर्वसाधारण बिगर आदिवासी गटाचे उमेदवार अनिल सुखदेवराव दहिवले, जगदीश शंकर लंजे, अनुसूचित जाती गटाचे किसन शिवा बोरकर, आदिवासी महिला गटातून बिरण विश्वनाथ चव्हारे, मंदा रेवचंद राऊत, इतर मागास गटातून प्रमोद मार्तंड रहेले, भटक्या विमुक्त जाती/विमाप्र गटामधून मदन इंदर शहारे असे उमेदवार आहेत. तर शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये सर्वसाधारण आदिवासी गटातून निलकंठ किरसान, पूनाजी नाईक, चरणदास घासले, निलकंठ भोयर, केवळराम नाईक, तुलाराम मारगाये, सर्वसाधारण बिगर आदिवासीमध्ये पृथ्वीराज खोब्रागडे, लैलेश्वर शिवणकर, अनुसूचित जातीत प्यारेलाल रंगारी, महिला आदिवासी गटातून पार्वता घरतकर, तुरसा मारगाये, इतर मागास गटात सुरेश परशुरामकर, तसेच भटक्या जाती-जमाती-विमाप्र गटातून कचरू मेश्राम असे उमेदवार आहेत. तर अपक्ष सर्वसाधारण बिगर आदिवासी व इमाव अशा २ गटातून विजयसिंह राठोड यांनी उमेदवारी स्वीकारली आहे. यामध्ये शेतकरी विकास पॅनल ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित तर शेतकरी परिवर्तन पॅनल भाजप-शिवसेना प्रणित असल्याचे समजते. असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जि.प. प्राथमिक शाळेत मतदान होणार आहे.लोकहिताचे व शेतकरी हिताचे कामे यावर निवडणुकीचा निर्णय ठरणार असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे. (वार्ताहर)
बाराभाटी सेवासंस्थेची निवडणूक रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 12:32 AM