वाचनालयांना मदत : अल्प पर्जन्यमान असलेल्या भागात लावली झाडेगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावाचा सर्वांगीण विकास करायचा असल्याने शासनाच्या या मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. गावाच्या विकासासाठी असलेली शांततेतून समृध्दीकडे जाणाऱ्या योजनेतून गावात आमूलाग्र परिवर्तन घडविण्यात आले.तंटामुक्त गावांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून गावाच्या परिक्षेत्रात गायरान व सरकारी जमिनीवर , पिंपळ, वड, उंबर, चिंच, लिंब, पिंपरी, जांभूळ, आंबा, कवठ, साग अशी दिर्घायूषी व अल्प पर्जन्यमान असलेल्या भागातही वाढणाऱ्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात येत आहे. गावाच्या परिक्षेत्रातील पर्यावरण रक्षण/सरंक्षण, जलस्त्रोतांचे सरंक्षण, शुध्दीकरण व अभिवर्धन करणे, गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी, गावतळी यातील गाळ उपसून जलसाठ्यात अभिवृध्दी केली.गावातील रस्त्यावर सौरउर्जेच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था केली. गावातील सर्व पशूधनाचे लसीकरण, आरोग्य तपासणी व रोगप्रतिबंधक उपाययोजना करणे, गावातील जैववैविधतेनुसार वेगवेगळया अन्नधान्याच्या बी-बियाणांची निर्मिती, वाणांचे जतन व संवर्धन, गावाच्या प्राकृतिक सौदर्याचे जतन व संवर्धन करणे, गावाच्या परिक्षेत्रातून जाणाऱ्या ओढे, नदीपात्राचे अतिक्रमण हटवून ओढे, नदीचे शुध्दीकरण करणे, गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर घेणे, गावात स्थापित ग्राम सुरक्षा दलासाठी गणवेश पुरविणे, गावातील शाळेतील वाचनालयासाठी ५ हजार रूपयापर्यंतचे संदर्भग्रंथ/पुस्तके देणे, जलविकास व्यवस्था, कचराकुंड्या, सार्वजनिक शौचालये, शाळा खोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारती,चावड्या यांच्या देखभाल व दुरूस्तीवर खर्च करण्यात आला. ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयानुसार अमलबजावणी करण्याची आणि ग्रामसभेच्या निर्णयानुसार खर्च करून त्यांचे हिशेब ठेवणे व ग्रामसभेला अहवाल सादर करणे आणि सबंधित शासकीय यंत्रणाना याबाबत आवश्यक ती माहिती पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकामार्फत तंटामुक्त गाव समितीची आहे.(तालुका प्रतिनिधी)अंकेक्षण अहवाल गेलाच नाहीतंटामुक्त मोहीमेतून मिळालेल्या पुरस्कार रकमेचा खर्च शासनाच्या नियोजन पत्रीकेनुसार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्या खर्चाचे तंतोतंत पालन ग्रामपंचायतीकडून करण्यात येते किंवा नाही याची कालबध्द तपासणी सबंधित तहसिलदार, गट विकास अधिकारी, सबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस प्रमुख आणि पुरस्कार रकमेचा विहित सूचनांनुसार विनियोग होईल याबाबत सबंधित तालुका समिती नियंत्रण ठेवील, असे शासनाने सूचविले होते. परंतु या समित्यांनी पुरस्कार रकमेच्या विनियोगाकडे दुर्लक्ष केल्यामुळे योग्य कामावर पुरस्कारचे पैसे खर्च झाले का याचा अहवाल अद्याप शासनाला गेलाच नाही.
आदर्श गावाच्या संकल्पनेला लोकचळवळीचा आधार
By admin | Published: February 14, 2017 1:07 AM