शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

शेतीला सौरपंपांचा आधार

By admin | Published: October 07, 2016 1:57 AM

विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे

सितेपालात यशस्वी प्रयोग : आर्थिक जीवनासह सामाजिक स्थितीत सुधारणागोंदिया : विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभातून व्यक्तीचे कौटुंबिक जीवनमान उंचवून दरडोई उत्पन्न वाढविण्यासोबतच सामूहिक विकासही करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर या अल्पभूधारक शेतकऱ्याने शासनाच्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेवून शेतीला सिंचनाखाली आणले व उत्पादनात वाढ करून समृध्दीचा मार्ग शोधला आहे.सालेकसा हा राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्ह्यातील तालुका. दुर्गम, मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलदृट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. मागास व दुर्गम भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामधून त्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यास मदत होत आहे. सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर हे अल्पभूधारक शेतकरी. जेमतेम तीन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरिनर्वाह चालवितात. जिंदाकुर हे अनुसूचित जाती प्रवर्गात येत असल्यामुळे १९९५ या वर्षात त्यांनी विशेष घटक योजनेच्या लाभातून सिंचनासाठी विहीर तयार केली. पावसाच्या पाण्यावर पूर्वी अवलंबून राहून हिरामन धानपीक घेत असायचे. शेतात विहीर झाल्यामुळे त्यांनी कृषिपंप जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे रितसर तेव्हाच अर्ज केला होता. परंतु त्यांच्या विहिरीच्या शेतापर्यंत वीज पुरवठा करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज वितरण कंपनीला २५ विजेचे खांब उभे करावयाचे होते. त्यामुळे त्यांच्या शेतातील विहिरीला कृषिपंपाची जोडणी देणे शक्य झाले नाही.हिरामन यांचा मोठा मुलगा गजानन याने सालेकसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा घेतल्यामुळे सालेकसा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात वायरमन अप्रेंटीशीप करीत होता. या कार्यालयातच काम करीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननला झाली. जवळपास २० वर्षापेक्षा जास्त कालावधी शेतात विहीर तयार करण्यास झाला. परंतु वीज पुरवठा शेतीला नसल्यामुळे डिझेल इंजीनचा शेतीला सिंचनासाठी वापर ते करीत होते. सौर कृषिपंप योजनेची माहिती गजाननने आपल्या वडिलांना दिली. त्यामुळे शेतातील विहिरीवर सौर कृषिपंप बसविण्याचा निर्णय हिरामनने घेतला.तीन एकर शेतीतील विहिरीवर ३ एचपी सौर कृषिपंप बसविण्यासाठी त्यांनी ४ मार्च २०१६ रोजी लाभार्थ्याचा हिस्सा म्हणून २० हजार २५० रु पयांची डिमांड वीज वितरण कंपनीच्या सालेकसा येथील कार्यालयात भरली. केंद्र शासनाने या सौर कृषिपंपासाठी चार लाख ५ हजार रु पये किंमत निश्चित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याचा ५ टक्के हिस्सा २० हजार ५०० रूपये, १ लाख २१ हजार ५०० रूपये ३० टक्के केंद्र सरकारचे अनुदान. राज्य शासनाचा ५ टक्के हिस्सा म्हणजे २० हजार ५०० रु पये आणि ६० टक्के म्हणजे २ लाख ४३ हजार रु पये कर्ज उचलून वीज वितरण कंपनी लाभार्थ्याला देणार आहे.सौर कृषिपंप योजनेतून मे २०१६ मध्ये सौर कृषिपंप हिरामनच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आले आहे. सौर कृषिपंपामुळे खरीप हंगामात धानाला पाणी देता आले. कधी कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होत होती. आता मात्र उत्पादनात कधीच घट येणार नाही. विहिरीवर लावण्यात आलेल्या सौर कृषिपंपामुळे उलट वाढ होणार असून रबी हंगामातदेखील धानासोबतच भाजीपाला पिके व उन्हाळी धानपीक घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाचेही महत्व हिरामनला कळले असून भविष्यात शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा विचार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही आणि आवश्यक तेवढेच पाणी थेट पिकाला देता येईल.पूर्वी शेतात विहीर नव्हती. विहीर तयार करण्याचे स्वप्न विशेष घटक योजनेतून पूर्ण झाले. शेतातील विहिरीपर्यंत कृषिपंपाला वीज जोडणी करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र राज्य सरकारने दुर्गम व मागास भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज जोडणी न देता थेट सौर कृषिपंप देवून अशा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वीज वितरण कंपनीने आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी ही इच्छा सौर कृषिपंप देवून पूर्ण केल्यामुळे आता माझ्या आर्थिक जीवनात तर बदल होईलच. सोबतच सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे हिरामन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)