अनेक वर्षांपासून कोसमतोंडी येथे आठवडी बाजार भरतो. येथील गट क्रमांक ५०२ या गट क्रमांकाची ०.२८ हेक्टर आर ही जागा बाजारासाठी निश्चित करण्यात आली. परंतु अतिक्रमणामुळे या ठिकाणी बाजार भरण्यास अडचण निर्माण होत आहे. याबाबत अनेकदा ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले; परंतु राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रश्नांवर चर्चाच करण्यात आली नाही. अतिक्रमणाबाबत १८ मार्चला अर्ज करण्यात आला होता; परंतु ग्रामसेवक गोमासे यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे पुन्हा २७ एप्रिलला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनावर ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमणे आणि अडथडे दूर करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीला आहेत, असे नमूद करीत कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवकाची भूमिका व जनसामान्यांना सोबतचे व्यवहार बरोबर नसल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अतिक्रमण न हटिवल्यास आंदोलन करण्याचा इशारा गौरेश बावनकर यांनी दिला आहे.
अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाकडून केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:27 AM