शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

कोरोना प्रतिबंधासाठी जागरुक आणि जबाबदार व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 6:00 AM

शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक ठरणार आहे. गर्मीमुळे हा विषाणू टीकत नाही ही बाब सिद्ध झालेली नाही.

ठळक मुद्देराजा दयानिधी । कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व ‘हँडवॉश स्टेशन’ची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोव्हेल कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र खबरदारी घेतल्यास या विषाणूंचा प्रसार रोखता येवू शकतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला लागण होण्याची साखळी आपण तोडली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी जवाबदार आणि जागरुक रहावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारी (दि.२०) कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणूंचा प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई.ए.हाशमी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड तथा सर्वच विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.दयानिधी यांनी, कोरोना विषाणूंबाबत १४ दिवसांचा लागण कालावधी आहे. या दिवसात परदेशातून आलेल्या व्यक्तींनी घरातच राहावे. अशा व्यक्तींसाठी तालुकास्तरावर सुद्धा विलगीकरणाची सोय करण्यात आलेली आहे.शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्याच आरोग्यासाठी अपायकारक ठरणार आहे. गर्मीमुळे हा विषाणू टीकत नाही ही बाब सिद्ध झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. वारंवार तांत्रिक पद्धतीने २० ते ४० सेकंदांपर्यंत हात धुवून आपण स्वत:चा बचाव करु शकतो असे सांगत हात धुण्याच्या पद्धतीवर सुद्धा मार्गदर्शन केले.मडावी यांनी, नागरिकांनी घाबरुन जावू नये व स्वत:ची काळजी घेवून गर्दीच्या ठिकाणात जाणे टाळावे असे सांगीतले. अल्ताफ हमीद यांनी, अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे सांगीतले. याप्रसंगी कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी माहिती दिली. त्याचप्रकारे, कर्मचाऱ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले. आयोजनासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.अभ्यागतांसाठी ‘हॅँडवॉश स्टेशन’जिल्हा परिषद कार्यालयात दररोज अनेक नागरिक भेट देतात. कोरोना विषाणूंंचा फैलाव होवू नये तथा नागरिकांना हात धुण्याची सवय लागावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात ‘हॅँडवॉश स्टेशन’ तयार करण्यात आले आहे. अभ्यागतांनी कार्यालयात प्रवेश करण्यापुर्वी हात तांत्रिक पद्धतीने धुवूनच कार्यालयात प्रवेश करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.ठळक मुद्देगर्मीमध्ये हा विषाणू वाढत नाही, ही बाब सिद्ध झालेली नाही.गर्दीच्या ठिकाणात जाणे टाळा.हात नियमित व वारंवार धुवा.बाहेर फिरण्याऐवजी घरीच रहा.कोणत्याही अफवा पसरवू नको, अफवांवर विश्वास ठेवू नका.माहितीसाठी आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळाला भेट द्या.सत्यता पडताळूनच संदेशांची देवाण-घेवाण करा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस