ऑनलाईन लोकमतगोरेगाव : जिल्ह्यात शिक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्व. निर्धनराव पाटील-वाघाये यांचे योगदान विसरता येणार नाही. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे दार उघडे करुन गोरगरीबांना शिक्षण देणारी लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ उत्तम शिक्षण देणारी संस्था आहे. चोपा क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम सुरु झाल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे उघडले आहेत. महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविला आहे. मुलींनो भरपूर शिका, आई- वडीलांचे ओझे न बनता स्वत:च्या बळावर सक्षम होऊन त्यांना आधार द्या, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी (दि.२७) येथे केले.तालुक्यातील स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय चोपा येथील नवीन इमारत लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार सेवक वाघाये, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती पी.जी.कटरे, माजी सभापती झामसिंग बघेले, इंजि. नरेंद्र वाघाये, विलास वाघाये, सुधीर कुकडे, सरोज वाघाये उपस्थित होते. पटेल म्हणाले, सध्याचे युग हे संगणकाचे आणि स्पर्धेचे युग आहे. संगणकामुळे जगात काय घडते याची माहिती काही सेकंदामध्ये मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यानो स्पर्धा परीक्षांची तयारी करा, भरपूर अभ्यास करा आणि ठरविलेले ध्येय गाठा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पर्यावरणातील बदलाचे शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. त्यामुळे केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. राज्यातील विद्यमान सरकारने केवळ मोठी आश्वासने दिली. मागील तीन वर्षात एकही भर्ती नाही, आम्ही गेलो, भेलचा कारखाना गेला, जिल्ह्याचा विकास कोण करणार, मागील तीन वर्षांत जिल्ह्याचा विकास खुंटल्याचा आरोपही पटेल यांनी केला. या वेळी माजी आमदार सेवक वाघाये यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तायक्वांडो स्पर्धेत प्रथम आलेली उमा पटले व पदवी अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या मोहरीश खुने यांचा खा. पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जी.आर. भैसारे, संचालन सतीश शहारे व आभार पी.के. बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.आर.डी. जगणीत, प्रा.बी.वाय. शेंडे, प्रा.डी.वाय. बावणकर, प्रा.एस.एस. तांडेकर, प्रा. राम ठाकुर, प्रा.आर.एस. शेळके, के.एन. रहांगडाले, सी.डी. राऊत, जी.एम. बिसेन, डी.आर. समरीत यांनी सहकार्य केले.
मुलींनो स्वत:च्या बळावर सक्षम व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:29 AM
जिल्ह्यात शिक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्व. निर्धनराव पाटील-वाघाये यांचे योगदान विसरता येणार नाही.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : महाविद्यालय इमारत लोकार्पण सोहळा