शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

सावधान ! तरूणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:27 AM

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी तरूण मंडळी सर्वाधिक कारणीभूत आहे. लहान मुले व ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी तरूण मंडळी सर्वाधिक कारणीभूत आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरातच राहत असले तरी त्यांच्याच घरातील तरूण मंडळी घरातून विविध कारणांनी बाहेर जाऊन कोरोना घेऊन घरी परत येत आहेत. त्यामुळे घरातील मंडळी कोरोना पाशात अडकत असल्याचे दिसत आहे.

भाजी, औषधी किंवा किराणा वैगरे घेण्याचे सोडून इतरही कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी तरूण मंडळी सहजरीत्या घराबाहेर पडत आहेत. कोरोनापेक्षा त्यांना पाेलिसांची भीती वाटत असली तरी विविध कारणे पुढे करून ते घराबाहेर पडतात. बाहेरून घरात कोरोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन म्हाताऱ्या व बालकांना हसत-खेळत कोराेनाची भेट देत आहेत. यामुळेच २४ तास घरातच राहणारे म्हातारे व लहान बालकेही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग करण्यासाठी त्यांच्याच घरातील तरूण मंडळी कारणीभूत ठरले आहे. ज्या तरूणांनी घरात कोरोना आणला ते सुखरूप आहेत. परंतु घरातील म्हाताऱ्यांना त्यांनी जीवन-मरणाच्या दारात नेऊन सोडले आहे. तरूणांच्या बेजबाबदारपणाला घरातीलच मंडळींनी लगाम लावण्याची गरज आहे व तेव्हाच कोरोनाला आळा बसेल.

.....

ही पहा उदारहण

१) कोरोनाच्या भीतीमुळे माझे आई-बाबा मला शेजारच्या घरीही खेळायला जाऊ देत नाही. तरी देखील मला कोरोना झाला. माझा मोठा भाऊ घरातून बाहेर जातोे त्याला काहीच झाले नाही आणि मला कोरोना झाला, आम्ही घरी असतो तरी देखील कोरोना झाला आहे, असे एका उपचार घेणाऱ्या मुलाने म्हटले आहे.

...

२) मी आपले काम केल्यानंतर घरातच आराम करतो. घरातील मंडळीशिवाय माझा दुसऱ्या कुणाशीही संपर्क आला नाही. घरातील मंडळी खूप कमी प्रमाणात घराबाहेर जातात. तरीही मी कोविड पॉझिटिव्ह आलो. गृहकामासाठी, काही साहित्य आणण्यासाठी घरातील मंडळी बाहेर जाणार नाही तर काय. परंतु खूप काळजी घेऊनही आम्ही पाॅझिटिव्ह आलो आहोत. आताही काळजी घेणे सुरूच असल्याचे एका वृद्धाने सांगितले.

.............

बाहेरून घरी आल्यास ही घ्या काळजी

१) आपण कामानिमित्त किंवा बाजारातून घरी परतल्यास घरात प्रवेश करण्याच्या अगोदर साबणाने आंघोळ घालूनच घरात प्रवेश करावा. जेणेकरून बाहेरून कोरोना विषाणू घरी घेऊन गेले तरी ते घरात प्रवेश करणार नाहीत.

२) आंघोळ करण्यासाठी काढलेल्या कपड्यांना व आंघोळीनंतरच्या कपड्यांना एका बादलीत कपडे धुण्याचे पावडर असलेल्या पाण्यात भिजवायचे . भाजीपाला आणल्यास त्यालाही पाण्यातून धुवून काढायचे.

३) बाहेरून घरी गेल्यास गरम पाणी प्यावे, हळदीचा चहा घ्यावा, गरम अन्न खावे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

.....

सोळा वर्षांखालील पॉझिटिव्ह - ८५

६० वर्षांवरील पॉझिटिव्ह - ५२०

एकूण पॉझिटिव्ह- २०,६७०

.....

अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. नियमितपणे तोंडाला मास्क लावावा. शारीरिक अंतर ठेवूनच इतर आवश्यक कामे करावीत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विना कामाने घराबाहेर पडणारे स्वत:चा व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी प्रत्येकाने विचार करावा.

डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया.