लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील १२ दिवसात कोरोना बाधितांच्या रुग्ण वाढीला ब्रेक लागला होता. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा वाढले होते. मात्र मंगळवारपासून पुन्हा कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढ आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा ग्राफ उंचावत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी १२० नवीन बाधितांची भर पडली तर दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ६० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे नागरिकांना थोडी काळजी घेण्याची गरज आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत आतापर्यंत १३ लाख ४१ हजार ६५५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात २२८ कोरोना बाधित आढळले. तर गंभीर आजाराचे ७९९ रुग्ण आढळले. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली जात असल्याने रुग्ण जरी वाढ होती असली तरी यामुळे प्रादुभार्व रोखण्यास मदत होणार आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असल्याने थोड चिंतेचे वातावरण निमार्ण झाले आहे. गुरूवारी जिल्ह्यात आढळलेल्या १२० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. गोरेगाव १, आमगाव १०, देवरी ४, सडक अर्जुनी ३२, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२७३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ७४५५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ११० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत ७१२ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोना ससंर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३४४१९ स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आले. यापैकी २६४०२ नमुने निगेटिव्ह आले आहे.२६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. कोराना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २९८८६ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी २६९०६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर २९८० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
सावधान । कोरोनाचा आलेख उंचावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 5:00 AM
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत आतापर्यंत १३ लाख ४१ हजार ६५५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात २२८ कोरोना बाधित आढळले. तर गंभीर आजाराचे ७९९ रुग्ण आढळले. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली जात असल्याने रुग्ण जरी वाढ होती असली तरी यामुळे प्रादुभार्व रोखण्यास मदत होणार आहे.
ठळक मुद्दे१२० कोरोना बाधितांची भर : दोन बाधितांचा मृत्यू : ६० कोरोना बाधितांनी केली मात