शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

वाहतुकीचा नियम तोडाल तर खबरदार; ८० सीसीटीव्हीची तुमच्यावर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 5:00 AM

कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेरे सुरूही झाले परंतु संपूर्ण काम न झाल्यामुळे सद्यस्थितीत  त्या कॅमेऱ्यांच्या संचलनाची जबाबदारी पाेलिसांकडे देण्यात आली नाही. गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३५ हजार ३९ जणांना मागील ११ महिन्यात दंड केला. त्या दंडाची रक्कम १५ लाख १८ हजार आहे. गोंदिया शहरात बसविण्यात आलेल्या ८० कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चपराक बसणार आहे. नियम मोडले तर खबरदारीचा इशारा पोलिसांकडून वाहन चालकांना आहे.

ठळक मुद्दे१४२० वाहन चालक ट्रीपल सीट; सीटबेल्ट न लावणाऱ्या ३७०९ चालकांना दंड

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनियंत्रीत वाहन चालविल्याने अपघातात वाढ होत आहे. वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालवित असल्याने त्या वाहन चालकांना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाॅच ठेवला जाणार आहे. यासाठी गोंदिया शहरातील ८० ठिकाणी चौकाचौकात कॅमेरे बसविण्यात आले आहे. गुन्हेगारीवर वाॅच ठेवण्यासाठी व अनियंत्रीत वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी हे सीसीटीव्ह कॅमेरे मदत करणार आहेत. या सीसीटीव्हींचे काम सुरू आहे. कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेरे सुरूही झाले परंतु संपूर्ण काम न झाल्यामुळे सद्यस्थितीत  त्या कॅमेऱ्यांच्या संचलनाची जबाबदारी पाेलिसांकडे देण्यात आली नाही. गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३५ हजार ३९ जणांना मागील ११ महिन्यात दंड केला. त्या दंडाची रक्कम १५ लाख १८ हजार आहे. गोंदिया शहरात बसविण्यात आलेल्या ८० कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चपराक बसणार आहे. नियम मोडले तर खबरदारीचा इशारा पोलिसांकडून वाहन चालकांना आहे.

या कारणास्ताव होते कार्यवाहीहेल्मेट न वापरणे, परवाना न काढता वाहन चालविणे, भरधाव व धोकादायक स्थितीत वाहन चालविणे, नो पार्कींग, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, ट्रीपल सीट, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सीट या वाहनांवर कारवाई केली जाते.

१५ लाख १८ हजाराचा दंड वसूलविना हेल्मेटच्या ७९ चालकांना ३९ हजार ५०० रूपये दंड, नो पार्कींगच्या १६४ वाहनांना ३६ हजार ८०० रूपये, सीटबेल्ट नसलेल्या ३७०९ चालकांना ७ लाख ४१ हजार ८०० रूपये, भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्या ५९ जणांना ५९ हजार, मोबाईलवर बोलणाऱ्या २९३ चालकांना ५८ हजार ६००, परवाना न घेतलेल्या १४४ जणांना ७१ हजार ७००, धोकादायक वाहन चालविणाऱ्या ४१ जणांना ४१ हजार, वाहतुकीस अडथळाच्या ९२८ प्रकरणांत १ लाख ८५ हजार ६०० रूपये, ट्रीपलसीटच्या १४२० चालकांना २ लाख ८४ हजार रूपयाचा दंड ठोठावून ११ महिन्यात वसूलही करण्यात आला.

एप्रिल महिन्यात सर्वाधिक कारवायाकोरोनामुळे यंदा एप्रिल महिन्यात सर्वत्र लाॉकडाऊन होते. परंतु या काळात घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांवर सर्वाधीक कारवाई करण्यात आली. ५ हजार ७२९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यंदाच्या ११ महिन्यातील सर्वाधीक कारवाया एप्रिल महिन्यातील आहे.

भरधाव वेगात वाहने चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. यात मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात. यंदाच्या सुरूवातीच्या नऊ महिन्यातील अपघातात ७४ जणांचा मृत्यू झाला. परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यातच ४२ जणांचा अपघातात मृत्यू झाला. हे मृत्यू भरधाव वेगात वाहन चालविल्यामुळे आहेत.-दिनेश तायडे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकcctvसीसीटीव्ही