शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार अर्जुनी मोरगाव-सानगडी मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 6:58 PM

परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो

बोंडगावदेवी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अस्वल ठार झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव-सानगडी मार्गावर रविवारी (दि.११) दुपारी घडली.अर्जुनी मोरगाव ते सानगडी, निमगाव हा परिसर जंगल व्याप्त आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. तर गेल्या काही दिवसांपासून अस्वल आणि एका पट्टेदार वाघाचा वावर आहे.

काही गावकऱ्यांना या अस्वल आणि वाघाचे सुद्धा दर्शन झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अर्जुनी मोरगाव ते सानगडी मार्गावर रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने अस्वलाला जोरदार धडक दिली. यात अस्वलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

माहिती मिळताच अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. आर. कटरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृत अस्वलाचा पंचनामा केला. मृत अस्वलाचे शवविच्छेदन प्रकाष्ट निष्कासन अधिकारी एस. जी. अवगान यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. समीर शेंद्रे यांनी केले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर वन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया