फिर्यादी संजय चौधरी (३९,रा.फुलचूर) हा त्याचा साथीदार धीरज तुरकर याच्यासोबत प्रिन्स चौकात घरासमोर बसून गप्पा मारीत होते. दरम्यान तिघे आरोपी एकाच दुचाकीने आले व धीरजसोबत असलेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना शिवीगाळ करू लागले. यावर फिर्यादीने शिवीगाळ का करता असे म्हटले असता आरोपी क्रमांक १ ने तेथे असलेल्या प्लॅस्टिक टेबलने धीरजच्या तोंडावर व डोक्यावर मारले. तर आरोपी क्रमांक २-३ यांनी लाथाबुक्क्यांनी चेहऱ्यावर व पाठीमागे मारून जखमी केले. हे बघून फिर्यादी मध्यस्थी करण्यास गेला असता आरोपी क्रमांक १ व ३ यांनी पकडून खांद्यावर व पसलीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. यावर फिर्यादी व धीरज ग्रामीण पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींना त्यांना बम्लेश्वरी मंदिराजवळ अडविले व पोलिसात तक्रार दिली तर ठार करू, अशी धमकी दिली व आरोपी क्रमांक १ याने चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर व खांद्यावर मारून जखमी केले. पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ३२६, ३४१, ५०६, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
जुन्या वादातून दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:34 AM