लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील किडंगीपार येथील गिधाड्या तलावाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून शासकीय कार्यालयात धूळखात पडला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडे वांरवार तक्रार केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गिधाड्या तलावाच्या सौंदर्यीकरणाला दफ्तरदिंरगाईचा फटका बसत आहे.डोंगरगाव क्षेत्राचे तत्कालीन जि.प.सदस्य मुनेद्र नांदगाये यांनी तत्कालीन जि.प.सदस्य विजय शिवणकर यांच्याकडे पाठपुरावा करुन किडंगीपार येथील गिधाड्या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला होता. जि.प.लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी तलावाच्या दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी २६ जून २०१५ ला सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या तलावाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत करण्यासाठी २०१५-१६ नियोजनात समावेश करण्यात आला.तलावाचे सर्वेक्षण झाल्यानंतर पिचींग, गेट,वाटरकोट,नाला बांधकामाकरिता अंदाजपत्रक तयार करण्यात आले. जानेवारी २०१६ पासून या तलावाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटून अद्यापही तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली नाही.या तलावाचे सौंदयीकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदारांनी सुध्दा शासनाकडे पाठपुरावा केला होता. पण यानंतरही प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नाही.
दफ्तरदिरंगाईत अडकले गिधाड्या तलावाचे सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 9:21 PM
तालुक्यातील किडंगीपार येथील गिधाड्या तलावाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून शासकीय कार्यालयात धूळखात पडला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडे वांरवार तक्रार केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
ठळक मुद्देगावकऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार : तीन वर्षांपासून रखडले काम