शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जन आंदोलन समितीच्या उपोषणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:49 PM

खासगी शाळांकडून मनमर्जी कारभार सुरू असून शिक्षणाधिकारी काहीच कारवाई करीत नसल्याने गुरूवारपासून जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरूवात केली.

ठळक मुद्देपालकांचे साखळी उपोषण : शिक्षणाच्या बाजारीकरणाविरूद्ध लढा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खासगी शाळांकडून मनमर्जी कारभार सुरू असून शिक्षणाधिकारी काहीच कारवाई करीत नसल्याने गुरूवारपासून जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरूवात केली. यांतर्गत एनएसयुआय जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर आमरण उपोषणावर बसले असून पालकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांना तुडवून येथील खासगी शाळा संचालक आपले नवनवीन नियम लावून शाळा चालवित आहेत.अवाढव्य शिक्षण शुल्क, गणवेश व पुस्तकांसाठी पालकांची पिळवणूक सुरू आहे. या विरोधात जन आंदोलन समितीच्या माध्यमातून सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती.तेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाईसाठी सहा दिवसांची मुदत मागीतली होती. मात्र मागील आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे जन आंदोलन समितीने गुरूवारपासून उपोषण सुरू केले. एनएसयुआय जिल्हाध्यक्ष तुळसकर यांच्यासह पहिल्या दिवशी नगरसेविका दीपिका रूसे, पालक ममता सोमवंशी, माही मक्कड, सीमा बैस, एकनाथ वहिले साखळी उपोषणावर बसले आहेत.याप्रसंगी गजानन उमरे, राकेश ठाकूर, आलोक मोहंती, सुनील तिवारी, देवा रूसे, क्रांती जायस्वाल, शिलू ठाकूर, भागवत मेश्राम, मंटू पुरोहीत, योगेश ठाकरे, विन्नि गुलाटी, गौरव वंजारी, राहुल पांडे, सिनू राव, निशांत राऊत, मयूर मेश्राम, तौशिम शहा, सन्नी भोयर, सरफराज शेख, योगेश चौधरी, खुमेंद्र परिहार, राहुल मेंढे, सुरेश सुमन व अन्य पालक उपस्थित होते.ठोस कारवाईची मागणीशाळांमध्ये पालक-शिक्षक समितीचे गठन करून त्यांच्या परवानगी शिवाय शिक्षण शुल्क निर्धारीत करू नये, एनसीईआरटीच्या पुस्तकांचा वापर करावा, खासगी प्रकाशनाची पुस्तके व गणवेश शाळा प्रशासनाकडून विक्री करु नये, पालकांकडून विलंब शुल्क घेवू नये, नियमांचे पालन न करणाºया शाळा प्रशासनाला पाच लाख रूपयांचा दंड व तीन वर्षांची शिक्षा ठोठावून शाळेची मान्यता रद्द करावी अशी तरतूद असून या मागण्यांसाठी जन आंदोलन समितीने उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.

टॅग्स :Educationशिक्षण