लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून डिजटल हस्ताक्षर प्रमाणपत्र (डीएसी) हरविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कमेचे वाटप रखडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये गटविकास अधिकाºया विरोधात असंतोष निर्माण झाला असून कारवाही करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यात मनरेगा अंतर्गत कुशल कामे सन २०१७-१८ या वर्षात एक कोटी १३ लाख १६ हजार रु पये व सन १८-१९ या वर्षात दोन कोटी ५९ लाख ७७ हजार रुपयांची कामे करण्यात आली. या रक्कमेची मागणी शासनाकडून गटविकास अधिकारी यांनी करावयास पाहिजे होती. मात्र या अधिकाºयांनी स्व:ताची डिजटल स्वाक्षरी प्रमाणपत्र गहाळ केल्याने त्या रक्कमेची मागणी पंचायत समितीला आतापर्यंत या रक्कमेची मागणी करता आला नाही. मनरेगा अंतर्गत शौचालय बांधकाम, गोठा बांधकाम, सिंचन विहीर बांधकाम, शोष खड्डे तयार करण्यात आले आहेत.जिल्ह्याला मिळालेल्या मनरेगा रक्कमेतुन गोरेगाव पंचायत समितीला कामाचा अनुदान निधी चाळीस लाख २३ हजार मंजूर झाले आहे. मात्र गटविकास अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे ही रक्कम मिळू शकली नाही. यासंदर्भात लेखाअधिकारी उमेश पंधरे यांना विचारले असता डीएसी गटविकास अधिकाºयांनी चार दिवसांपूर्वी हरवली आहे. नवीन डीएसी तयार केली आहे मात्र डीएसी संगणकातील जावा सॉफ्टवेअर स्वीकृत करीत नाही. हा एक तांत्रिक दोष आहे. डीएसी स्वीकृत होताच मनरेगा कामाचे अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.या संदर्भात माहीती आमदार विजय रहांगडाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनरेगा कुशल कामाची रक्कम दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कामचुकारपणा करणाºया गटविकास अधिकारी बानकर यांच्यावर कारवाही करण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगीतले आहे. सरपंच सेवा संघटनेच्या पदाधिकाºयांनी या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे.मनरेगाचे कामाचे रक्कम मंजूर आहे. मात्र तांत्रिक बिघाड असल्यामुळे ही रक्कम जमा होऊ शकत नाही.याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली. त्यांनी आयुक्तांना याची माहिती दिली आहे. रक्कम कधी जमा होणार ही सांगता येत नाही.- रोहिणी बानकर,गटविकास अधिकारी गोरेगाव
अधिकाऱ्याच्या चुकीने लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 9:19 PM
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून डिजटल हस्ताक्षर प्रमाणपत्र (डीएसी) हरविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कमेचे वाटप रखडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देडीएसी हरविली : कारवाही करण्याची मागणी, लाभार्थ्यांमध्ये रोष