शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

जनजाती समाजाला शासकीय योजनांचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:19 AM

जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवनवासी कल्याण आश्रमची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.मंगळवार (दि.३०)वनवासी आश्रमच्या शिष्टमंडळाच्या वतीने समाजाच्या समस्या व मागण्यांची माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून विदर्भ वनवासी कल्याण आश्रम ही संस्था अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी सन १९७८ पासून संलग्न आहे.विदभार्तील जनजाती समाजाकरीता विशेष प्रकल्पामार्फत जनजाती बहुल जिल्हा, तालुक्यात आणि जिथे जनजाती समाज राहतो,अशा ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जनजाती समाजाच्या घटनादत्त न्याय मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रम सातत्याने विविध पातळीवर लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहे. परंतु, शासनाचे जनजाती समाजाच्या प्रश्न व मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे समाज शासकीय योजना, सोयी-सवलतींपासून वंचित आहे. आपल्या न्याय मागणीसाठी वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने सध्या राज्यव्यापी मोहिम राबविली जात आहे.आदिवासींच्या सुविधांच्या व हक्काच्या बेकायदेशीपणे उपयोग करणाºया बोगस आदिवासींची चौकशी करुन त्यांचे जनजाती म्हणून सर्व अधिकार काढून शिक्षा करण्यात यावी. वन अधिकार कायद्याअंतर्गत परंपरा जंगल भूमी, जलसंपदा आमच्या हक्काचे असून व्यक्तिगत, सामुहिक वनहक्क प्राप्तीसाठी विलंब होत आहे. विशेष योजना राबवावे, जनजातीबहूल क्षेत्र पेसा अंतर्गत सरकारने त्वरीत घोषीत करावे. पेसा नियमाप्रमाणे ग्रामसभांची मान्यता व स्वतंत्र कोष खाते क्रियान्वित करावे.जनजाती वीर, हुतात्मे यांच्या जयंती, स्मृतीदिन शासकीय पातळीवर साजरे व्हावेत, प्राथमिक ते पदवी शिक्षणासाठी ज्या सुविधा शासनातर्फे मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने प्रभावी यंत्रणा राबवावी. जनजातीतील लोककला, संस्कृती, देवदेवता, उत्सव, परंपरांचे संवर्धन करुन विशेष संरक्षण व आर्थिक सहाय द्यावे. वनवासींना शासकीय लाभासाठी आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावे. गोंदिया तालुक्यात मुलांमुलींसाठी वसतीगृह सुरू करण्यात यावे, वनवासींना रोजगार देऊन त्यांचे स्थलांतरण थांबविण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात वनवासी कल्याण आश्रमचे नगर अध्यक्ष जयदिप जसानी, डॉ.नाजुकराव कुंभरे, शंकरलाल मडावी, गुलाब गेडाम, रामेश्वर शेंडे, श्रीधर चुटे, सुशिला मानकर, मंदा पिहीदे, रामानंद राऊत, नेमेश्वर बसोने, बाळकृष्ण बिसेन, राहूल वैद्य, ओ.पी.गुप्ता, दलजीत खालसा, अनुप कटारे उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना