लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली.विकास प्रक्रि येत कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. कामगार काम करीत असतांना त्याला सुरक्षितता मिळावी,आरोग्याच्या सुविधांसह अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नोंदणीकृत इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांचा रोजगार व कल्याणासाठी सेवा शर्तीचे नियमन करु न महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. जिल्ह्यात या मंडळाकडे नोंदणी केलेल्या २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली. जिल्ह्यातील १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगार आणि मागील १२ महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना, त्यांच्या पाल्यांना तसेच पत्नीच्या प्रसुतीसाठी मंडळाच्या कल्याणकारी योजनेतून आर्थिक मदत देण्यात आली. कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नोंदणी जिवित असलेल्या जिल्ह्यातील १५६ लाभार्थी कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रती कामगार ३ हजार रु पये याप्रमाणे ४ लाख ६८ हजार रु पयांची मदत करण्यात आली आहे. १४ कामगारांच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी २ लाख ५० हजार रु पयांची आर्थिक मदत करण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी, इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या १४३ पाल्यांना ६ लाख १२ हजार ५०० रु पये शैक्षणिक व प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य करण्यात आले आहे. १४ पाल्यांना पदवीच्या शिक्षणासाठी प्रत्येकी २० हजार रु पये याप्रमाणे २ लाख ८० हजार रु पये महाविद्यालय प्रवेश, पुस्तके आणि शैक्षणिक सामुग्रीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. नोंदणीकृत तीन कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबांना अंत्यविधी योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रु पयांची आर्थिक मदत अंत्यविधीसाठी करण्यात आली आहे. चार विधवा पत्नींना प्रत्येकी २४ हजार रु पये प्रमाणे ९६ हजार रु पयांची मदत करण्यात आली. विवाह करणाºया दोन कामगार लाभार्थ्यास प्रत्येकी ३० हजार रु पये विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी अनुदान देण्यात आले आहे.८७ कामगारांच्या ९८ पाल्यांना पुस्तक संच देण्यात आले. जिल्ह्यातील ८ हजार ६३६ नोंदणीकृत कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रु पयापर्यंत अनुदान देण्यात आले. १३०० कामगारांना कौशल्य विकास वृध्दीकरण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विविध २८ कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात दिला जात आहे.
२२ हजार कामगारांना योजनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:56 PM
कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली.
ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ : ४ कोटी ४९ लाख रुपयांचे अर्थसहाय्य