शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांच्या दारापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:26 PM

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राहणाऱ्या सामान्यजनांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वागिण विकास साधावा यासाठी राज्यशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. समाजातील दिव्यांग महिला पुरुषांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : लाभार्थी दिव्यांगांना कुलर भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राहणाऱ्या सामान्यजनांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वागिण विकास साधावा यासाठी राज्यशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. समाजातील दिव्यांग महिला पुरुषांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. गावातील शेवटच्या घटकातील वंचितास शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.इंजोरी-बोरटोला येथील ग्रामपंचायतच्यावतीने ३ टक्के निधीतून दिव्यांग लाभार्थ्याना कुलर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, ग्रामपंचायत उपसरपंच दिपीका रहेले, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, पोलीस पाटील डाकराम मेंढे, माजी जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, ग्रा.पं.सदस्य नलु शेंडे, देवयानी मेश्राम, सखाराम सयाम उपस्थित होते.पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, दिव्यांगाना स्वयंपूर्ण करुन समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळावी, त्यांचा आदर व्हावा यासाठी त्यांच्या दारापर्यंत विविध योजना पोहचविण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगीतले. ग्रामीण भागात विकासाची गंगा येवून सामान्य माणूस मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामाची गती वाढविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.यावेळी शांता घोरमारे, चंद्रकुमार भेंडारकर, डुलन मेंढे, तिरसागर हेमने, राष्ट्रपाल शेंडे, सुनंदा रहेले, शंकर हुकरे, रोहित तवाडे, भिमराव शिवणकर, गुलाब शेंडे, हिरकन्या खंडाईत, पुष्पा दडमड या १२ दिव्यांगांना नामदार बडोले यांच्या हस्ते कुलरचे वाटप करण्यात आले. संचालन मोहन भेंडारकर यांनी केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी जमईवार यांनी मांडले. आभार ग्रामसेवक गोमासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिपंकर उके, पृथ्वीराज भेंडारकर, दिलेश मेश्राम, लंकेश मेंढे, राधेशाम हुकरे, जयंत हेमने, दिलीप हुकरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले