लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जीवनात सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बलांसाठी जीवनातील काही क्षण काढून त्यांना मदत करणे आपले ध्येय असले पाहिजे. भाऊबीज व दीप उत्सव या संकल्पनेने या दुर्लक्षित नागरिक वस्तीत नवचैतन्य निर्माण केले आहे. युवा शक्ती फाऊंडेशनने बहिणींना दिलेली आधार भेट सर्वांना प्रेरणा देणारी आहे, असे मत नायब तहसीलदार एस.जी. पवार यांनी यांनी व्यक्त केले.आर्थिक हलाखीचे जीवन जगणाºया नागरिक लोकवस्तीत सामाजिक संकल्पनेतून पुढाकार घेत युवा शक्ती फाऊंडेशन व जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भाऊबीज व दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक एस.डी. दासुरकर होते. पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस.जी. काळे, नायब तहसीलदार एस.जी. पवार, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष यशवंत मानकर, डॉ. कार्तिक मेंढे, डॉ. राहुल बिसेन, पत्रकार संघाचे अध्यक्ष पालकराम वालदे, ज्योती खोटेले, भावना कटकवार, वर्षा शर्मा, रमा चव्हाण, रितेश अग्रवाल, प्रमोद कटकवार, राजीव फुंडे, नरेंद्र कावळे, राकेश शेंडे, उत्तम नंदेश्वर, मंगला महारवाडे, निखिल कोसरकर उपस्थित होते.पोलीस निरीक्षक एस.जी. दासुरकर म्हणाले, आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करीत असतो. यात सामान्य माणूस आपल्या गरजा पूर्ण करतो. परंतु लोकवस्तीत अनेक नागरिक दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करीत आहेत. शिक्षणाचे वय असताना मुले रोजंदारीचे काम करतात, हे वास्तव आहे. यात युवा शक्ती फाऊंडेशन सदर लोकवस्तीत सामाजिक संकल्पनेतून बदल घडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे नक्की बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविकातून यशवंत मानकर यांनी, युवा शक्ती फाऊंडेशनच्या वतीने चालणाºया विविध सामाजिक उपक्रमाचे माहिती दिली. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना युवा शक्तीने तत्परतेने आपली सेवा देण्याचे ध्येय बाळगले आहे. नागरिकांच्या हितासाठी आपल्या सेवाकार्याचा विस्तार करणार, अशी माहिती मानकर यांनी दिली. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक एस.जी. काळे, वर्षा शर्मा, अंजली जांभुळकर, पालकराम वालदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घनश्याम अग्रवाल, कैलाश तिवारी, निमेश दमाहे, सोनू फुंडे, गणेश महारवाडे, अनिता मानकर, संजय खोटेले, राजेश मानकर यांची उपस्थिती होती. संचालन राजीव फुंडे यांनी केले. आभार नरेंद्र कावळे यांनी मानले.भाऊबीज ओवाळणीआमगाव येथील दुर्लक्षीत गोंड लोकवस्ती, बिंजवार लोकवस्ती, बजरंग चौक, बेदाळी पॉवर हाऊस लोकवस्ती परिसरात भाऊबीज व दीप उत्सव कार्यक्रमात आर्थिक दुर्बल घटकातील बहिणींनी भाऊबीज ओवाळणी करुन दीप उत्सव साजरा केला. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने महिलांना ओवाळणीत आधार भेट दिली.
भाऊबीजेला दिली बहिणींना आधार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:02 AM
जीवनात सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बलांसाठी जीवनातील काही क्षण काढून त्यांना मदत करणे आपले ध्येय असले पाहिजे.
ठळक मुद्देदुर्लक्षित लोकवस्तीत युवकांचा पुढाकार : युवा शक्ती फाऊंडेशनचा उपक्रम