शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कवलेवाडा ते बॅरेज रस्त्याचे भूमिपूजन

By admin | Published: August 15, 2016 12:26 AM

धापेवाडा उपसासिंचन योजना टप्पा २ अंतर्गत कवलेवाडा ते बॅरेजपर्यंत पोच रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले

विजय रहांगडाले : कोट्यवधींच्या रस्ते बांधकामांचा लवकरच होणार शुभारंभ तिरोडा : धापेवाडा उपसासिंचन योजना टप्पा २ अंतर्गत कवलेवाडा ते बॅरेजपर्यंत पोच रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले. या वेळी आ. रहांगडाले यांनी सांगितले की, रस्त्याचे हस्तांतरण जि.प. बांधकाम विभागाद्वारे धापेवाडा उपसा सिंचन योजनेला करण्यात आले होते. रस्त्याचा उपयोग सोमा इंटरप्राईजेस द्वारे बॅरेजचे बांधकाम साहित्य ने-आणकरिता तसेच अदानी पॉवरच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. या जड वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्त्याचे होत असलेले नुकसान, त्यावेळेस रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी सोमा इंटरप्राईजेस द्वारे बांधकाम अवधीमध्ये केल्यामुळे भरुन निघत होते. परंतु त्यावेळी रस्त्याची मजबुती करण्यात आली नाही. सन २०१४ ला बॅरेजचे काम पूर्ण झाले. त्यातच बॅरेजचा रस्ता सार्वजनिक रहदारीकरिता खुला करण्यात आला. त्यामुळे तिरोडा ते सिहोरा या गावामध्ये रहदारी प्रचंड वाढली. परिवहन मंडळाने बसेस सुरू केले. पण रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती नसल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खराब झाला. लोकांचे आग्रह असल्यामुळे व रहदारीमध्ये अडचणी असल्यामुळे सदर रस्ता नियोजनामध्ये घेऊन त्यास मंजूर करण्यात आले व इतर बुडीत रस्ते व पुलाच्या कामास मंजुरी देण्यात आली. करटी खु. येथे ख. क्र. १४९ ते ३२ मध्ये शेतावरील पोच रस्त्याचे काम ४०.४० लाख, मरारटोला ते करटी पांदन रस्त्यावरील बॉक्स टाईप पुलाचे काम ५१.३८ लक्ष, मरारटोला ते मामा भाचा देव गावरस्त्यावर बॉक्स टाईप पुलाचे काम ४८.३६ लाख, मरारटोला ते करटी इं.जि. मार्गावरील बॉक्स पाईप पुलाचे काम ९१.९ लाख, मरारटोला येथे ख.क्र. ३७५ ते ३६३ पर्यंत शेतातील पोच रस्त्याचे काम १७.७७ लाख, मरारटोला येथे ख.क्र. ३८० ते ३६५ पर्यंत शेतावरील पोच रस्त्याचे काम ६९.८२ लाख, करटी खुर्द येथील येथे ख.क्र. १११ ते १०२ पर्यंत शेतावरील पोच रस्त्याचे काम १२.२१ लाख ही कामे लगेच सुरू होणार आहेत. कवलेवाडा ते बॅरेच पोच रस्त्याचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ . भजनदास वैद्य होते. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, पं.स. सदस्य रमणीक सयाम, पं.स. सदस्य पवन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, अध्यक्ष भाजपा महिला आघाडी तुमेश्वरी बघेले, भाजप शहर अध्यक्ष सलामभाई शेख, धीरज बरियेकर, सारंग मानकर, सरपंच देवन पारधी, जयसिंग उपासे, माजी सरपंच शिवलाल परिहार, महादेव कटणकर तसेच मोठ्या संख्येने गावकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)