लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : एमएसईबी म्हणजे मंडे टू संडे ईलेक्ट्रीक बंद असे विनोदाने या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे म्हटले जाते. कधी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत बिल देणे तर कधी रिंडींग न घेताच बिल पाठविले जाते. मात्र ज्या ग्राहकाच्या घरी विद्युत मीटरच लागलेले नाही त्या ग्राहकाला सुध्दा विद्युत वितरण कंपनीने वीज बील पाठविल्याचा प्रकार तालुक्यातील बघोली येथे उघडकीस आला. या प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची खिल्ली उडविली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, बघोली येथील रहिवाशी विजय रामचंद्र बडगे यांनी दारिद्र रेषेखालील योजनेतंर्गत महावितरणच्या गोरेगाव शाखेत विद्युत मीटरसाठी अर्ज केला होता. मात्र महावितरणने विद्युत मीटर न लावताच त्यांना जुलै महिन्याचे दहा रुपयांचे वीज बील पाठविले. बडगे यांना महावितरणच्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्टीब्युशन कंपनीने पोल नं.००००००१०, मंजुर भार ०.१३ केव्हीचे वीज पुरवठा देयक मीटर क्रमांक ०५३७५८०५६९७ नुसार दोन युनिटचे बील दहा रुपये पाठविले. घरी मिटर लागले नसल्यामुळे महावितरणने बील कसे पाठविले असा प्रश्न बडगे यांना पडला. त्यांनी यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वाहाने यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला असता वीज वितरण कंपनीकडून ७ जुलैला विद्युत मीटरचा पुरवठा केला असून कंत्राटदाराकडे वीज मिटर लावण्याचे काम आहे. त्यांनी मीटर लावले की नाही याची माहिती घेवून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले. दरम्यान या प्रकारामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे.
विद्युत मीटर न लावताच पाठविले बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:44 PM
एमएसईबी म्हणजे मंडे टू संडे ईलेक्ट्रीक बंद असे विनोदाने या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे म्हटले जाते. कधी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत बिल देणे तर कधी रिंडींग न घेताच बिल पाठविले जाते.
ठळक मुद्देग्राहकाला धक्का : विद्युत वितरण कंपनीचा प्रताप