शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

निवडक तलावांवर पक्षीगणना

By admin | Published: February 03, 2017 1:33 AM

पर्यावरण संतुलन तथा वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था ‘सेवा’च्या (सस्टेनिंग एनव्हायर्नमेंट अ‍ॅण्ड वाईल्ड लाईफ असेम्ब्लेज)

स्थानिक व प्रवासी पक्षी : अनेक स्वयंसेवी संस्थांचा समावेशगोंदिया : पर्यावरण संतुलन तथा वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था ‘सेवा’च्या (सस्टेनिंग एनव्हायर्नमेंट अ‍ॅण्ड वाईल्ड लाईफ असेम्ब्लेज) पुढाकाराने वनविभाग व पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था, जिल्ह्यातील पक्षीप्रेमी तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील काही निवडक तलावांवर पक्षीगणना करण्यात आली. यात जिल्ह्यातील परसवाडा, झिलमिली, लोहारा, झालिया, नवतलाव (कुम्हारटोली), माकडी, बाजारटोला, सिवनी, घिवारी, कटंगी, सलंगटोला, घुमर्रा (कलपाथरी), चोरखमारा व करटी नदी परिसर इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या स्वयंसेवकांची चमू बनवून पक्षी गणना करण्यात आली. यात जिल्ह्यातील निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पर्यावरण संतुलनात पृथ्वीवर आढळणारे प्रत्येक जैविक व अजैविक घटकांचा महत्वपूर्ण योगदान आहे. जैविक घटकांमध्ये पक्ष्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. नैसर्गिकरित्या जंगल व जैवविविधता वाढविण्यात पक्षी महत्वपूर्ण भूमिका साकारतात. ते वनस्पतींचे उत्तम नैसर्गिक वाहक असल्याने पर्यावरण संतुलनात त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.हिवाळ्याच्या दिवसात हजारोंच्या संख्येने प्रवासी पक्षी तथा स्थानिक पक्षी येथील तलाव व नदीमध्ये भोजनाच्या शोधात हजारो किमीचा प्रवास करून येतात. प्रवासी पक्षी सायबेरिया, चीन, मंगोलिया, अफगानिस्तान व संपूर्ण युरोपातून येतात. येथील पोषक वातावरण तथा भोजनाची विपूलता या पक्ष्यांना येथे आकर्षित करण्यात महत्वपूर्ण भूमिका साकारतात. या पक्ष्यांचे येथे मोठ्या प्रमाणात येणे येथील संपन्न जैवविविधतेचे सूचक समजले जात आहे. पक्ष्यांच्या आगमनाने येथील निसर्गप्रेमींना विविध पक्षांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. येथील पर्यावरणासाठीही हे शुभसंकेत आहे. (प्रतिनिधी)सहभागी होणाऱ्या संस्था व स्वयंसेवकसेवा संस्थेकडून भरत जसानी, सावन बहेकार, मुनेश गौतम, दुष्यंत रेभे, संजिव गावडे (ठाणा इंचार्ज रावणवाडी), तटकरे (ठाणा इंचार्ज देवरी), अविजित परिहार, चेतन जसानी, शशांक लाडेकर, दुष्यंत आकरे, विकास फरकुंडे, कन्हैया उदापुरे, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, जैपाल ठाकूर, दीपक मुंदडा, रविंद्र वंजारी, रूची देशमुख, स्वाती डोये, गुलशन रहांगडाले, सलीम शेख, रतिराम क्षीरसागर, राहुल भावे, मंगलेश डोये, दिनेश नागरिकर, झनकलाल रहांगडाले, मधुसूदन डोये, प्रशांत डोंगरे, राकेश डोये यांनी पक्षीगणनेत सहभाग घेतला.