गोंदिया : वीर राजे चिमना बहादूर फाउंडेशनच्यावतीने १९१८ च्या स्वातंत्र्य संग्रामाचे जनक कामठा परगना वीर राजे चिमना बहादूर यांनी २३९ वी जयंती व शिवाजी महाराज यांची जयंती कामठा चौक येथे साजरी करण्यात आली. वीर राजे चिमना बहादूर यांनी स्वातंत्र्य संग्राम योजना तयार करून प्रथम स्वातंत्र्य संग्रामाची निव ठेवली. अशा या महान व्यक्तीचे सदैव स्मरण होत राहावे, यासाठी बिरसी विमानतळाला वीर राजे चिमना बहादूर यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन खा. सुनील मेंढे यांनी केले.
कामठा चौक येथे आयोजित वीर राजे चिमना बहादूर यांच्या जयंती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खिलेश्वर बाबा खरकाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सहषराम कोरोटे, माजी आमदार भरत बहेकार, रमेश कुथे, इतिहासकार ओ.सी.पटले, डॉ. दीपक बहेकार, नीरज जागरे, के.बी. चव्हाण, गजेंद्र फुंडे, धन्नालाल नागरीकर, विजय बहेकार उपस्थित होते. संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून समाज कल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुधीर बागडे, डॉ. भुषण फुंडे, सुनील देशमुख, पंकज शिवणकर, गजानन उमरे, कमलबापू बहेकार, संजय बहेकार, प्रीतम गायधने, जगदीश चुटे, महेश उके उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्य करणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक बहेकार, डॉ. नंदकिशोर राऊत, डॉ. प्रमेश गायधने, निशा देवानंद खोटेले, एमएसटी टॉपर
लक्ष्म
संजय आसुटकर, नगरसेवक घनश्याम पानतवने, राजकुमार कुथे, जितेंद्र पंचबुद्धे, परिवहन अधिकारी कल्पना पाथोडे, संजय टेंभरे यांचा चिमना बहादुर उत्सव समितीच्यावतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ॲड. रामकृष्ण चौधरी यांनी केले व आभार डॉ. सविता बेदरकर व विजय बहेकार यांनी मानले.