ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : वारकरी साहित्य परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व जिल्हा नियोजन समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रांगणात गुरूवारी (दि.१५) सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. याची जय्यत तयारी युध्दस्तरावर सुरु आहे.गुरुवारी या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते होणार आहे. या वेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष ह.भ.प.डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, स्वागताध्यक्ष तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खा. प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.तत्पूर्वी गुरुवारी सकाळी ७ वाजता राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे हस्ते दुर्गा चौक येथून ग्रंथ दिंडी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.यानिमित्ताने विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संताच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्यावर विश्लेषणात्मक चर्चा व्हावी आणि सामाजिक समतेचा विचार समाजाचा सर्व स्तरापर्यंत पोहोचावा हा या आयोजना मागील हेतू आहे.अर्जुनी-मोरगाव नगरीत प्रथमच अश्या स्वरुपाच्या संमेलनाचे आयोजन होत असून यानिमित्ताने राज्यातील संत व राज्याच्या अनेक मंत्र्याची मांदियाळी राहणार आहे.समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभागाने सुरु केलेला प्रथम संत चोखामेळा पुरस्कार सप्तखंजीरी वादक सत्यपाल महाराज यांना प्रदान केला जाणार आहे.या पुरस्कारादाखल त्यांना ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र दिले जाणार आहे.आजचे कार्यक्रमसकाळी ७ वाजता-दिंडी सोहळा शुभारंभसकाळी १० वाजता : उद्घाटन समारंभदुपारी १ वाजता - समेलनाध्यक्ष सूत्र प्रदान सोहळादुपारी २ वाजता- कीर्तनदुपारी ३ वाजता : परिसंवाददुपारी ४.३० वाजता - भारूडदुपारी ५.३० वाजता - परिसंवादसायं. ७ वाजता-कीर्तनरात्री ८.३० वाजता-भारूडरात्री १० वाजतापासून -खुली भजन स्पर्धा (महिला व पुरुष)
संत साहित्य संमेलनाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 9:20 PM
वारकरी साहित्य परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व जिल्हा नियोजन समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन...
ठळक मुद्देकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते आज उद्घाटन