शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

सामान्य प्रसूतितून जुळ्या बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 6:00 AM

बाल व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी कोणतीही प्रसूती आरोग्य संस्थेत करावी असा आग्रह आरोग्य विभागाकडून धरला जातो. सामान्य प्रसूती उपकेंद्र, आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात केले जाते. परंतु अडचणीची किंवा गुंतागुंतीची प्रसूती असल्यास त्या बाळंतिनींना मोठ्या रूग्णालयातच पाठवून प्रसूती तज्ज्ञांच्या माध्यमातूनच प्रसूती केली जाते.

ठळक मुद्देबनगाव आरोग्य केंद्रात उत्तम सेवा : वेळेअभावी डॉक्टरांनी धोका पत्करून केली प्रसूती

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाल व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग नेहमीच प्रयत्न करतो. परंतु रूग्णांना किंवा गर्भवतींना उत्तम आरोग्य सेवा देण्यात जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अग्रेसर आहे. प्रसूती गुंतागुंत किंवा शक्य नसलेली प्रसूती बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सहजरित्या करण्यात आली. परिणामी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.बाल व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी कोणतीही प्रसूती आरोग्य संस्थेत करावी असा आग्रह आरोग्य विभागाकडून धरला जातो. सामान्य प्रसूती उपकेंद्र, आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात केले जाते. परंतु अडचणीची किंवा गुंतागुंतीची प्रसूती असल्यास त्या बाळंतिनींना मोठ्या रूग्णालयातच पाठवून प्रसूती तज्ज्ञांच्या माध्यमातूनच प्रसूती केली जाते.रूग्णांना किंवा गर्भवतींना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आमगाव तालुक्याच्या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरूवातीपासून प्रसिध्द आहे. याचीच पावती म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्याचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे महत्त्व राखीत हे प्राथमिक आरोग्य आमगाव शहरात असून ग्रामीण रूग्णालयाच्या तुलनेत अधिक पटीने दर्जेदार सेवा प्रदान करीत आहे. आमगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत भास्कर जमदाळ या कर्मचाºयाची पत्नी निलीमा गर्भवती होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या प्रसूतीची संभाव्य तारीख १ जानेवारी २०२० दिली होती. प्रसूतीचा वेळ जवळ आल्यावर भास्कर जमदाळ सुट्टी घेणार होते. परंतु पती नोकरीवर असतांना निलिमा जमदाळ यांना १८ डिसेंबरच्या सकाळी ५ वाजतापासून प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. काही वेळाने निलिमा यांनी आपल्या पतीला फोनवर सूचना केल्याने पोलीस कर्मचारी जमदाळ यांनी घर गाठून सकाळी ७ वाजता पर्यंत त्यांना बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पोटात जुळे बाळ आहेत हे आधीचेच माहित होते. परंतु प्रसूतीची संभाव्य तारीख पुढे असल्याने जमदाळ कुटुंबिय निवांत होते.१८ तारखेला पहाटेच प्रसूतीच्या वेदनात भर पडल्याने त्यांना बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर अवघ्या अर्ध्या तासाच प्रसूती नक्की होईल असा अंदाज डॉक्टरांना आला. एवढ्या कमी वेळात त्या गर्भवतीला आमगाववरून गोंदियाला पाठविणे शक्य नव्हते. पोटात जुळे बाळ असल्याने बनगाव येथील डॉक्टरांना त्या गर्भवतीची प्रसूती करणे धोक्याचे वाटत होते. परंतु वेळेअभावी प्रसूती करणे गरजेचे असल्यामुळे डॉक्टरांनी यासंदर्भात निलिमाच्या पतीला समजावून सांगितले. आणि प्रसूतीला सुरूवात केली.डॉक्टरांच्या कर्तव्य दक्षपणामुळे निलिमा जमदाळ यांनी दोन बालकांना जन्म दिला.वैद्यकीय अधिकारी डॉ. ताम्रध्वज नागपुरे, डॉ बृजबाला बोपचे यांनी सदर प्रसूती यशस्वीरित्या केली.या डॉक्टरांच्या मदतीला दोन अनुभवी अधिपरिचारीका छाया सूर्यवंशी, लता टेंभूर्णीकर होत्या. या चारही जणांच्या प्रयत्नाने निलिमाची सामान्य प्रसूती झाली.दोन्ही बाळ सुदृढनिलिमा भास्कर जमदाळ यांनी जन्म दिलेले दोन्ही बाळ सुदृढ आहेत. सकाळी ९.११ वाजता जन्मलेला पहिला बाळ ३ किलो १०० ग्रॅम वजनाचा तर सकाळी ९.१७ वाजता जन्मलेला दुसरा बाळ २ किलो ७०० ग्रॅम वजनाचा आहे. सामान्य प्रसूतीतून जुळे बाळ जन्माला येतात आणि तिही सामान्य प्रसूती एका प्राथमिक आरोग्य केंद्रात होणे ही बाब अत्यंत प्रशंसनिय आहे. सोबतच बाळ पोटात असतांना त्यांना शस्त्रक्रिया करूनच प्रसूती होईल अशी धास्ती दाखविणाºया खासगी डॉक्टरांना चांगलीच चपराक आहे.ग्रामीण रूग्णालय फक्त नावापुरतेआमगावला तालुका म्हणून ग्रामीण रूग्णालय आहे.परंतु हे ग्रामीण रूग्णालय स्वत:च आजारी आहे. आमगाव असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रूग्णालयासारखी सेवा देते. परंतु ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी आरोग्य सेवा मिळत नाही. हे ग्रामीण रूग्णालय फक्त नावापुरते आहे. प्रसूतीसाठी आलेल्या रूग्णांनाही रेफर केले जाते.दोन बाळ पोटात असल्यामुळे ती प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती तज्ज्ञांच्याच हातून होणे अपेक्षीत होते. परंतु अर्ध्या तासात प्रसूती होईल. गोंदियाला जातांना रसत्यातच प्रसूती होईल असे वाटत असल्याने मातेच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही प्रसूती करण्यात आली.-डॉ. ताम्रध्वज नागपुरेवैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल