तालुक्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदांसाठी निवडणुका होत आहेत. यात,१३ सदस्य असलेल्या केशोरी ग्रामपंचायतमध्ये गुरूवारी अध्यासी अधिकारी विलास निमजे यांनी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेतली. सरपंच पदासाठी गहाणे व प्रतिभा दीपक शेंडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर उपसरपंच पदासाठी बनकर व अरुण कवळू मस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्यात आली. यात, सरपंचपदासाठी गहाणे यांना ८ तर शेंडे यांना ५ मते मिळाली तसेच उपसरपंचपदासाठी बनकर यांना ८ तर मस्के यांना ५ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अध्यासी अधिकारी निमजे यांनी गहाणे यांना सरपंचपदी तर बनकर यांना उपसरपंचपदी निवडून आल्याचे घोषित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समिती माजी सदस्य रामलाल मुंगणकर, ग्रामविकास अधिकारी पी.आर. कुटे, पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे, तलाठी विनोद राऊत, चेतन समरीत, हिरादेव डोंगरवार व ग्रामवासी उपस्थित होते.
केशोरी ग्रामपंचायतवर भाजपचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:27 AM