येथील ग्रामपंचायतीवर भाजप पक्ष आरूढ होईल हे निश्चित झाले आहे. निवडून येण्यात महिलांनी बाजी मारली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी ग्रामपंचायत ही १३ सदस्यांची ग्रामपंचायत असून, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत सदस्य आठ, तर महाविकास आघाडी पॅनलचे पाच सदस्य निवडून आले. येथील ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित पॅनलने बाजी मारून बहुमत सिद्ध केले आहे. निवडून आलेल्या सदस्यामध्ये भाजपप्रणीत सदस्य नंदू दशरथ गहाणे, श्रीराम शेंडे, रामकृष्ण बाजीराव बनकर, नाशिका अनंतराव नेवारे, चारुलता वासुदेव सुकारे, ज्योती सुरेश गहाणे, प्रतिभा प्रभाकर उपरीकर, शिला जगन शिखरामे तर महाविकास आघाडी पॅनलचे श्रीकांत नारायण घाटबांधे, वासुदेव मळू मडावी,अरुण कवडू मस्के, प्रतिभा दीपक शेंडे, सुनंदा धनराज सय्याम यांचा समावेश आहे. येथील सरपंच कोण, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
केशोरी ग्रामपंचायतीवर भाजप्रणीत पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:29 AM