लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही. सत्तारुढ सरकार केवळ योजनांचे नामाकरण करणारे सरकार असल्याची टीका आ. गोपालदास अग्रवाल यांनी केली.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी खा. नाना पटोले, आ.प्रकाश गजभिये, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चुन्नीभाऊ बेंद्रे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी, राकेश ठाकूर, शकील मन्सूरी, अपूर्व अग्रवाल, नानू मुदलियार, सतीश देशमुख उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, सत्तारुढ सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव महात्मा फुले योजना केले मात्र योजनेच्या लाभापासून लाभार्थ्यांना दूर ठेवण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून हजारो शेतकरी अजुनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावावर पेट्रोल व डिझेलवर कृषी कर लावला. प्रत्यक्षात या निधीचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जात नसल्याचे चित्र आहे. सत्तारुढ सरकारची ध्येय धोरणे ही जनहीत विरोधी असून अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले.पटोले म्हणाले, भाजप सरकारच्या काळात प्रत्येक नागरिक लाईनमध्ये उभा आहे. कधी नोटबंदी तर कधी पीक विमा तर कधी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. जनधन योजनेतंर्गत नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने जनधन खात्यातून खातेदारांना पैसे काढण्याकरीता प्रतिबंध लावले आहे. महागाई आटोक्यात आणण्याऐवजी विविध कर लावून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढविल्या.त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अशा खोटारट्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हिच योग्य वेळ आहे. यासाठी कुकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
भाजपाने केवळ लोकहिताच्या योजनांचे नामांतरण केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:23 AM
केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : गोंदिया तालुक्यात प्रचार सभा