आमदारांचे निलंबन ही दडपशाही आहे. या सरकारच्या नाकर्तेपणासमोर आणल्यामुळेच सूडबुद्धीने विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी ही तुघलकी कारवाई करण्यात आली. या विरोधात निषेध जाहीर करण्यासाठी तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे आंदोलन करण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष अशोक लंजे, लक्ष्मीकांत धानगाये, जिल्हा सचिव शेषराव गिऱ्हेपुंजे, तालुका महामंत्री गिरधारी हत्तीमारे, परमानंद बडोले, शिशिर येळे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, डाॅ. बबन कांबळे, माजी उपसभापती राजेश कठाणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,चरणदास शहारे, प्रल्हाद कोरे, विलास वट्टी, माजी सभापती कविता रंगारी, माजी जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, रुपाली टेंभुर्णे, तुकाराम राणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश बारसागडे, दिलीप डागा, पुरुषोत्तम मेश्राम, महीपाल बडोले, प्रवीण भिवगडे, रमेश लांजेवार, राजू परशुरामकर यांचा समावेश होता.
भाजपने केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:36 AM