लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे शांत असलेल्या नगर परिषदेच्या राजकारणात विषय समिती सभापती निवडणुकीच्या आदेशानंतर भूंकप आला आहे. गोंदिया शहर विकास परिवर्तन आघाडीचे गटनेता पद राजकुमार कुथे यांच्याकडे गेल्याने नगर परिषदेतील पूर्ण सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाची वाट मोकळी झाल्याचे चित्र आहे. मात्र आता सभापतीपदासाठी जोडतोड सुरू होणार.नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १९ सदस्य, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ७ सदस्य, कॉँग्रेस पक्षाचे ९ सदस्य तर गोंदिया शहर परिवर्तन आघाडीत ८ सदस्य असून यामध्ये बहुजन समाज पक्षाचे ५, शिवसेना २ व १ अपक्ष सदस्याचा समावेश आहे. आघाडीच्या गटनेतापदी राजकुमार कुथे यांची निवड करण्यात आली होती. मात्र अघाडीतील बसपच्या ५ सदस्यांनी गटनेता म्हणून ललिता यादव यांची निवड करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी १४ फेब्रुवारी रोजी तसे आदेश दिले होते. याआधारेच १५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सभापतींच्या निवडणुकीत आघाडी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने हातमिळवणी करून विजयाची माळ गळयात पाडून घेतली होती.मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशा विरोधात कुथे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परिणामी नवनियुक्त सभापतींना त्यांचे अधिकार देण्यात आले नव्हते. तर याचिकेवर ३ जुलै रोजी न्यायालयाने आघाडीचे गटनेता कुथेच राहणार असा निर्णय सुनावला होता. या निर्णयामुळे निवडून आलेल्यांचे पद आपोआपच संपुष्टात आले होते. तेव्हापासून सभापतींची खुर्ची रिकामीच होती. मात्र जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा यांनी येत्या १६ तारखेला नगर परिषद सभापतींची निवडणूक घेण्याचे आदेश काढले. त्यामुळे पुन्हा एकदा नगर परिषदेच्या राजकारणात उथलपुथल सुरू झाली आहे.अशात आता काय नवे समिकरण तयार होतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.भाजपची बल्ले-बल्लेनगर परिषद सभापती पदासाठी पुन्हा निवडणुका होत आहेत. त्यातही आघाडीचे गटनेता कुथे असल्याने भारतीय जनता पक्षाची पूर्ण सत्तेसाठी वाट मोकळी दिसत आहे. त्याचे असे की, नगर परिषदेत ११ सदस्यांची विषय समिती आहे. यात, संख्याबळाच्या आधारे भाजपचे १९ सदस्य (नगराध्यक्षांसह) असून त्याआधारे विषय समितीत ५ सदस्य, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ७ सदस्य असून समितीत २ सदस्य, कॉँग्रेसचे ९ सदस्य असून समितीत २ सदस्य तर आघाडीचे ८ सदस्य असल्याने त्यांचेही २ सदस्य असतात. यात पक्ष व गटनेता आपापल्या सदस्यांची नावे देतो.अशात आता आघाडीकडून कुथे आपल्या २ समर्थकांना समितीत पाठविणार. म्हणजेच, भाजपचे ५ तर आघाडीतून २ म्हणजेच ७ सदस्य मिळून भाजप व कुथे समर्थक सत्ता काबीज करणार असे बोलले जात असून यापुर्वीही हा फॉर्म्युला जमला आहे.ऑनलाईन विशेष सभेचे आयोजननगर परिषद सभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत सकाळी १० ते १२ वाजतापर्यंत नामांकन अर्ज दाखल करावयाचे आहे. त्यानंतर दुपारी २ वाजतापासून निवडणूक प्रक्रिया पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ए. डब्ल्यू. खडतकर यांच्या अध्यक्षतेत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी बोलाविण्यात आलेली विशेष सभा ऑनलाईन होणार असून नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जाणार आहे. त्यामुळे सभेत भाग घेणाºया सदस्यांसोबतच शहरवासीयांनाही या निवडणुकीला घेऊन उत्सुकता लागली आहे.
सत्तेसाठी भाजपची वाट मोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:00 AM
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १९ सदस्य, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ७ सदस्य, कॉँग्रेस पक्षाचे ९ सदस्य तर गोंदिया शहर परिवर्तन आघाडीत ८ सदस्य असून यामध्ये बहुजन समाज पक्षाचे ५, शिवसेना २ व १ अपक्ष सदस्याचा समावेश आहे. आघाडीच्या गटनेतापदी राजकुमार कुथे यांची निवड करण्यात आली होती. मात्र अघाडीतील बसपच्या ५ सदस्यांनी गटनेता म्हणून ललिता यादव यांची निवड करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
ठळक मुद्देन.प. सभापती निवडणूक : राजकीय घडामोंडीनी वेग