शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
2
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
4
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
5
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
7
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
8
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
9
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
10
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
11
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
12
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
13
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
14
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
15
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
16
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
17
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
18
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
19
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
20
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

अर्जुनी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

By admin | Published: August 19, 2015 1:57 AM

तालुक्यातील सहकार विभागाला ढवळून काढणाऱ्या अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या.....

बोंडगावदेवी : तालुक्यातील सहकार विभागाला ढवळून काढणाऱ्या अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. सत्ताधारी भाजपासमर्थित किसान विकास आघाडीने एकहाती विजयी संपादन करून आपले वर्चस्व दुसऱ्यांदा कायम ठेवले. मात्र जिल्हा दुध संघाचे संचालक माजी आ.दयाराम कापगते यांच्या पुत्राचा पराभव टाळण्याची किमया भाजपा करू शकली नाही. ‘गड आला, पण सिंह गेला’ असे म्हणण्याची पाळी भाजपावर आली आहे.बाजार समितीच्या १९ संचालकासाठी ही निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपासमर्थित किसान विकास आघाडी व काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित परिवर्तन पॅनल या दोन गटामध्ये चुरस होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोन्ही पॅनलने सर्व आयुधांचा वापर करून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी गटाची सत्ता पालटण्यासाठी विरोधकांकडून शर्तीचे प्रयत्न केल्या गेले. परंतु मतदारांनी सत्ताधारी किसान विकास आघाडीला कौल देऊन बाजार समिती पुन्हा भाजपच्या ताब्यात देण्यात कसर सोडली नाही. विजयी उमेदवारांमध्ये किसान विकास आघाडीचे सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) गटामधून लायकराम भेंडारकर (२८९ मते), प्रमोद लांजेवार (२७६), प्रदीप मस्के (२६४), यशवंत कापगते (२५६), कुरैशी काशिफ जमा (२४६), छगन पातोडे (२३६), बिसराम फुलबांधे (२११), सहकारी संस्था महिला राखीव गटातून कुंदाबाई डोंगरवार (२७१), कमलाबाई कठाणे (२२९), इतर मागासवर्ग राखीव गटातून नूतनलाल सोनवाने (२५०), आर्थिक दुर्बल घटकामधून विलास फुंडे (२७६), ग्रामपंचायत अनु.जाती/जमाती गटातून व्यंकट खोब्रागडे (३१३), विपणन व प्रक्रिया गटातून केवलराम पुस्तोडे (१९), हमाल/तोलारी गटामधून चंद्रशेखर मेश्राम (३२) यांचा समावेश आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित परिवर्तन पॅनलचे ग्रामपंचायत मतदार संघातून विलास गायकवाड (२६२), व्यापारी व अडत्या गटातून सोमेश्वर सौंदरकर (१५), ईश्वरी चिठ्ठीने सर्वेश वल्लभदास भुतडा (१४) हे उमेदवार विजयी झाले.